India vs West Indies : कॅप्टन कोहलीचा रुद्र अवतार, टीम इंडियानं 6 विकेटनं जिंकला सामना

India vs West Indies : कॅप्टन कोहलीचा रुद्र अवतार, टीम इंडियानं 6 विकेटनं जिंकला सामना

94 धावा करत विराट कोहलीचा वन मॅन आर्मी शो!

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : वेस्ट इंडिजनं दिलेल्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीचा रुद्र अवतार पाहायला मिळाला. कोहलीनं 50 चेंडूत 94 धावा केल्या. वन मॅन आर्मीसह विराट कोहलीनं 188च्या स्ट्राईक रेटनं हा सामना भारताला 6 जिंकून दिला. यासह तीन सामन्यांचा मालिकेत भारतानं 1-0ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात रोहित शर्मा 8 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीनं आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. केएल राहुलनं या सामन्यात टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा करत विराट कोहलीच्या विक्रमाला मागे टाकले. विराट आणि राहुलनं सर्वात जलद 100 धावांची भागिदारी केली. मात्र केएल राहुल 40 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत 62 धावा करत बाद झाला. केरी प‍िएरेमं केएल राहुलला बाद केले. दरम्यान विराट कोहली एका बाजूनं आक्रमक फलंदाजी करत असताना या सामन्यातही ऋषभ पंत बेजबाबदार खेळी करत 18 धावांवर बाद झाला. शेल्डन कॉट्रेलनं पंतला बाद केले सल्यूट करत माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला श्रेयस अय्यर केवळ 4 धावा करत बाद झाला.

तत्पूर्वी, भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्यात पोलार्ड (37) आणि हेटमायर (56) यांनी तुफानी फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना विंडीजला पहिलाच धक्का दीपक चाहरनं दुसऱ्या ओव्हरला दिला. सिमन्स 2 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर ईव‍िन लुईस आणि ब्रेंडन क‍िंग यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांच्या 62 धावांच्या भागिदारीच्या जोरावर चांगली धावसंख्या उभारून दिली. ईव‍िन लुईसनं 40 धावा केल्या, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं त्याला बाद केले तर, किंगला रवींद्र जडेजानं माघारी धाडले. हेटमायर आणि पोलार्ड यांनी दणक्यात फलंदाजी करण्यास सुरुवात केली. हेटमायरनं आपले अर्धशतकही पूर्ण केले, त्यानंतर 56 धावांवर चहलनं त्याला बाद केले. पोलार्डनं 19 चेंडूत 37 धावांची आतषबाजी खेळी केली अखेर चहलनं त्याला माघारी धाडले. तर, शेवटच्या ओव्हरमध्ये होल्डरनं कसर पूर्ण केली.

या सामन्यात युवा खेळाडूंनी काही झेल सोडले त्याचा फटका संघाला बसला. त्यात वॉशिंग्टन सुंगरनं आपल्या 3 ओव्हरमध्ये 34 धावा देत 1 विकेट घेतली. तर, शिवम दुबेनं आपल्या एका ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या. जडेजा वगळता एकाही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता आली नाही. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या तर चहलनं 2 विकेट घेतल्या. या सामन्यात दीपक चहर सर्वात महागडा खेळाडू ठरला.

भारतीय संघ-विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार.

वेस्ट इंडिजचा संघ- कॅरेन पोलार्ड (कर्णधार), फेब‍ियन एलेन, शेल्‍डन कोटरेल, श‍िमरॉन हेटमायर, जेसन होल्‍डर, ब्रेंडन क‍िंग, ईव‍िन लुईस, कीमो पॉल, न‍िकोलस पूरन, केरी प‍िएरे, द‍िनेश रामदीन, शेरफेन रुदरफोर्ड, लेंडल स‍िमंस, हेडल वॉल्‍श जून‍ियर आणि केसर‍िक व‍िल‍ियम्‍स.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या