• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND Vs SL: श्रीलंकन विकेटकीपरचा लोकल भाषेतील सल्ला संजूसाठी ठरला घातक, चाहत्यांना आठवला 'धोनी'; पाहा VIDEO

IND Vs SL: श्रीलंकन विकेटकीपरचा लोकल भाषेतील सल्ला संजूसाठी ठरला घातक, चाहत्यांना आठवला 'धोनी'; पाहा VIDEO

भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या वनडे मॅच सीरिजमधली शेवटची वनडे मॅच नुकतीच श्रीलंकेत झाली. या मॅचमधून टीम इंडियाचा विकेटकीपर आणि बॅटसमन संजू सॅमसन याने वन डेमध्ये पदार्पण केलं. पण त्याच्या आउट होण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

  • Share this:
कोलंबो, 24 जुलै: भारत आणि श्रीलंकेदरम्यान श्रीलंकेत 3 वनडे मॅचेसच्या सीरिजचं (One Day Match Series) नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या सीरिजमधली शेवटची, तिसरी मॅच शुक्रवारी पार पडली. ही मॅच एका खास किश्श्यामुळे चर्चेत राहिली. या किस्सा वनडे मॅचेसमध्ये पदार्पण करणारा टीम इंडियाचा विकेटकीपर आणि बॅटसमन संजू सॅमसनसोबत (Sanju Samson) घडला. अनेकदा मॅचची रणनीती आखताना संघातील खेळाडू ग्राउंडवर एकमेकांशी मातृभाषेत संवाद साधत असतात. श्रीलंकन खेळाडूंनी (Players) नेमकं हेच केलं. संजू सॅमसनचा खेळ बारकाईने पाहणाऱ्या श्रीलंका संघाच्या विकेटकीपरने (Wicket keeper) सिंहली भाषेत (Sinhala Language) बॉलरला काही सूचना केल्या. भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या वनडे मॅच सीरिजमधली शेवटची वनडे मॅच नुकतीच श्रीलंकेत झाली. या मॅचमधून टीम इंडियाचा विकेटकीपर आणि बॅटसमन संजू सॅमसन याने वन डेमध्ये पदार्पण केलं. संजूने पदार्पणाच्या पहिल्याच मॅचमध्ये जोरदार बॅटिंग (Batting) करून क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. संजूच्या बॅटिंगमुळे काही क्षण श्रीलंकन संघावर दबाव निर्माण झाला होता. पूर्ण फॉर्ममध्ये असलेल्या संजूला कसं रोखायचं या एकाच विचारात श्रीलंकन खेळाडू, विशेषतः बॉलर होते. संजूची धुवॉंधार बॅटिंग काही केल्या ते रोखू शकत नव्हते. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात संजू सॅमसनने 46 बॉल्समध्ये 46 रन काढले. हे वाचा-चानूची चॅम्पियन बनण्याची कहाणी! मणिपूरची मीराबाई कशी ठरली भारताची सिल्व्हर गर्ल संजू आपल्या पहिल्यावहिल्या हाफ सेंच्युरीच्या (Half Century) अगदी जवळ पोहोचला होता. एकीकडे संजू धावांचा पाठलाग करत असताना दुसरीकडे श्रीलंकन संघावर दबाव वाढत होता. मात्र श्रीलंकन संघातली एक व्यक्ती संजूची बॅटिंग अगदी निरखून पाहत होती. श्रीलंकन विकेटकीपर मिनोद भानुका (Minod Bhanuka) संजू सॅमसनच्या बॅटिंगचा पूर्ण अंदाज घेत होता. याच दरम्यान मिनोद भानुकाने बॉलर प्रवीण जयविक्रमाला (Pravin Jayawickrama) सिंहली भाषेत सल्ला दिला आणि तो सल्ला संजूसाठी घातक ठरला. मिनोद भानुका प्रवीणला सिंहली भाषेत सल्ला देत असताना क्रिकेटप्रमींना काही क्षणांसाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीची (M.S. Dhoni) आठवण झाली. धोनी अशाच पद्धतीने विकेट्सच्या मागून बॉलर्सना हिंदी भाषेत सल्ला द्यायचा आणि त्याचा फायदा बॉलर्सना होत असे. 46 बॉल्समध्ये 5 चौकार आणि एका षट्काराच्या जोरावर 46 रन्स काढणाऱ्या संजूला रोखण्यासाठी मिनोद भानुकाने अत्यंत विचारपूर्वक बॉलर प्रवीण जयविक्रमाला आपली बॉलिंग पोझिशन (Bowling Position) बदलण्याचा सल्ला सिंहली भाषेत दिला. प्रवीण जयविक्रमाने हा सल्ला ऐकून पुढील बॉल त्यानुसार टाकला आणि याच बॉलमुळे संजू त्यांच्या जाळ्यात सापडला आणि त्याने मारलेल्या बॉलचा कॅच अविष्का फर्नांडोने घेतला. मिनोद भानुकाने सिंहली भाषेत दिलेला हा सल्ला संजूची बॅटिंग रोखण्यासाठी श्रीलंकन संघाच्या कामी आला.
First published: