Home /News /sport /

IND vs SL: सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकानंतरही राहुल द्रविड निराश, VIDEO VIRAL

IND vs SL: सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकानंतरही राहुल द्रविड निराश, VIDEO VIRAL

सूर्यकुमार यादवची विकेट गेल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडही (Rahul Dravid) निराश झाला. त्याची प्रतिक्रिया या VIDEO तून दिसेल.

    कोलंबो, 26 जुलै: सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) श्रीलंका दौऱ्यात (India vs Sri Lanka) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सूर्याला बराच काळ वाट पाहावी लागली, पण उशीरा मिळालेल्या या संधीचं तो सोनं करत आहे. यावर्षी मार्च महिन्यात त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये सूर्यकुमार यादवला प्लेयर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. 3 सामन्यांमध्ये त्याने 62 च्या सरासरीने 124 रन केले. या कामगिरीमुळे त्याची इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठीही निवड झाली आहे. सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजचा फॉर्म टी-20 सीरिजमध्येही कायम ठेवला आहे. पहिल्या टी-20 मध्ये त्याने 34 बॉलमध्ये 50 रन केले, यामध्ये 5 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. संजू सॅमसन 27 रनवर आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता, तेव्हा भारताचा स्कोअर 51 रनवर 2 विकेट होता. शिखर धवनसोबत त्याने 62 रनची महत्त्वाची पार्टनरशीप केली. श्रीलंकेचा स्पिनर वानिंदु हसरंगाच्या बॉलवर सिक्स मारून सूर्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यामधलं आपलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. हसरंगाच्या पुढच्याच बॉलवर त्याने पुन्हा एकदा सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल फिल्डरच्या हातात गेला आणि सूर्या आऊट झाला. सूर्यकुमार यादवची विकेट गेल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडही (Rahul Dravid) निराश झाला. तो आऊट झाला तेव्हा द्रविड डग आऊटमध्ये बसला होता. सूर्याने खेळलेल्या खराब शॉटची निराशा द्रविडच्या चेहऱ्यावर दिसत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूर्यकुमार यादवला त्याच्या चांगल्या कामगिरीचा फायदाही झाला आहे. पृथ्वी शॉसोबत तो इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दुखापत झालेल्या खेळाडूंचे बदली म्हणून हे दोघं श्रीलंका दौरा संपल्यानंतर इंग्लंडला रवाना होतील. IND vs SL : भारताने 9 नव्या खेळाडूंना दिली संधी, दोघं अजूनही बेंचवर आयपीएल 2020 नंतर सूर्यकुमारने 38 इनिंगमध्ये 38 पेक्षा जास्तच्या सरासरीने 1,323 रन केले आहेत, यामध्ये एक शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफीमध्ये 2019-20 साली त्याने 10 इनिंगमध्ये 56 पेक्षा जास्तच्या सरासरीने त्याने 508 रन केले, यात त्याने 2 शतकं आणि 2 अर्धशतकं केली.
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Sports

    पुढील बातम्या