मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : द्रविडसाठी श्रीलंका दौरा सगळ्यात महत्त्वाचा, लक्ष्मणने सांगितलं कारण

IND vs SL : द्रविडसाठी श्रीलंका दौरा सगळ्यात महत्त्वाचा, लक्ष्मणने सांगितलं कारण

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची (India vs Sri Lanka) सुरुवात 13 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडला असल्यामुळे भारतीय टीम नवोदितांसह श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 3 जुलै : टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची (India vs Sri Lanka) सुरुवात 13 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडला असल्यामुळे भारतीय टीम नवोदितांसह श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) या टीमच्या प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये युवा खेळाडूंसह अनेकांची नजर राहुल द्रविडवर असणार आहे, कारण त्याच्याकडे भविष्यातला टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून पाहिलं जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि द्रविडचा एकेकाळचा सहकारी व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

राहुल द्रविडसाठी श्रीलंका दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्याच्याकडे भविष्यातली टीम इंडिया बनवण्याची संधी आहे, असं लक्ष्मण स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाला. 'प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडवर दबाव नसेल, कारण त्याला युवा खेळाडूंसोबत काम करण्याचा अनुभव आहे. त्याला खेळाडूंना भविष्यातले चॅम्पियन करण्याची संधी आहे. प्रत्येकाला या दौऱ्यात खेळण्याची संधी मिळेल, असं नाही, पण द्रविडसोबत वेळ घालवल्याचा प्रत्येकाला फायदा होईल,' असं वक्तव्य लक्ष्मणने केलं.

दुसरीकडे इरफान पठाण (Irfan Pathan) यानेही राहुल द्रविडचं कौतुक केलं. 'द्रविड तरुणांना मार्गदर्शन करतो ज्यामुळे त्यांना पुढे जायची प्रेरणा मिळते. तो मुलांशी बोलतो त्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो. तो कायमच खेळाडूंमध्ये सकारात्मकता वाढवतो. एखादा खेळाडू श्रीलंकेत अपयशी ठरला, तर द्रविड त्या खेळाडूजवळ जाईल आणि त्याला मार्गदर्शन करेल, यामुळे खेळाडूमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल,' अशी प्रतिक्रिया पठाणने दिली.

इरफान पठाणने या कार्यक्रमात राहुल द्रविडची एक आठवणही सांगितली. 2007 वर्ल्ड कपमध्ये मानहानीकारक पराभव झाल्यानंतर द्रविडने कर्णधार म्हणून सगळ्या खेळाडूंना हा पराभव शेवट नाही, आयुष्य यापेक्षा खूप मोठं आहे, असं सांगितल्याचं पठाण म्हणाला.

First published:

Tags: Cricket, India Vs Sri lanka, Rahul dravid