कोलंबो, 30 जुलै : टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) याला श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं होतं. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे धवनला ही जबाबदारी देण्यात आली, पण गुरुवारी झालेल्या सामन्यात धवनच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली. इनिंगच्या पहिल्याच बॉलला शिखर धवन आऊट झाला. दुष्मंता चमीराच्या (Dushmantha Chameera) बॉलिंगवर धवनने धनंजय डि सिल्वाला (Dhananjaya De Silva) कॅच दिला. गोल्डन डक वर, म्हणजेच पहिल्या बॉलला आऊट होणारा धवन पहिला भारतीय कर्णधार बनला आहे.
तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. 5 ओव्हरमध्येच टीम इंडियाच्या 4 विकेट गेल्या होत्या आणि स्कोअर फक्त 25 रनच झाला होता. शिखर धवन मॅचच्या चौथ्या बॉलला आऊट झाला होता. चमीराच्या बाहेरच्या बॉलवर खेळण्याचा धवनने प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि धनंजयने कॅच पकडण्यात कोणतीही चूक केली नाही.
आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 करियरमधली धवनची ही 68 वी मॅच होती. याआधी त्याने 1759 रन केले, यामध्ये 11 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये तो पहिल्यांदाच गोल्डन डकवर माघारी परतला, तर आंतरराष्ट्रीय करियरमध्ये तिसऱ्यांदा त्याच्या नावावर या रेकॉर्डची नोंद झाली.
श्रीलंकेविरुद्धच्या या टी-20 सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने पराभव झाला. भारताने टी-20 सीरिजची पहिली मॅच 38 रनने जिंकली होती, यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेचा 4 विकेटने आणि तिसऱ्या सामन्यात 7 विकेटने विजय झाला. पहिल्या सामन्यानंतर टीम इंडियाचा ऑलराऊंडर कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 8 खेळाडूंना अखेरच्या दोन टी-20 मधून माघार घ्यावी लागली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.