मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL: टीम इंडियाचे नवे 'जय-वीरू', टी-20 नंतर वनडेमध्येही एकत्रच पदार्पण

IND vs SL: टीम इंडियाचे नवे 'जय-वीरू', टी-20 नंतर वनडेमध्येही एकत्रच पदार्पण

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताच्या (India vs Sri Lanka) दोन खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याआधी वर्षाच्या सुरुवातीला या दोघांनी एकाच सामन्यातून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्येही पाऊल टाकलं होतं.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 18 जुलै: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताच्या (India vs Sri Lanka) दोन खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याआधी वर्षाच्या सुरुवातीला या दोघांनी एकाच सामन्यातून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्येही पाऊल टाकलं होतं. अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले. योगायोग म्हणजे दोघांनी आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये अर्धशतकी खेळी केली होती.

पहिल्या सामन्यामध्ये इशान किशनला बॅटिंगची संधी मिळाली तेव्हा त्याने अर्धशतक केलं, पण सूर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यात बॅटिंगच मिळाली नाही. अखेर दुसऱ्या सामन्यात बॅटिंग मिळाली तेव्हा त्यानेही अर्धशतकी खेळी केली.

सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये (IPL) धमाकेदार कामगिरी केली. मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) चॅम्पियन बनवण्यात या दोन्ही खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरली. या कामगिरीमुळेच त्यांची पहिले भारताच्या टी-20 टीममध्ये आणि आता वनडे टीममध्ये निवड झाली.

सूर्यकुमार यादवचं लिस्ट ए मधलं रेकॉर्ड दमदार आहे. 98 मॅचमध्ये त्याने 37.55 च्या सरासरीने 2,779 रन केले आहेत, यामध्ये 3 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 100 पेक्षा जास्त आहे.

इशान किशनचा खराब फॉर्म

आयपीएल 2021 मध्ये इशान किशनला संघर्ष करावा लागला. या डावखुऱ्या बॅट्समनने 5 मॅचमध्ये फक्त 14.60 च्या सरासरीने 73 रन केले.

भारतीय टीम

शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दीपक चहर

First published:

Tags: India Vs Sri lanka, Ishan kishan, Suryakumar yadav