मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : भारत-श्रीलंका सीरिज संकटात, टीममध्ये कोरोनाचा शिरकाव

IND vs SL : भारत-श्रीलंका सीरिज संकटात, टीममध्ये कोरोनाचा शिरकाव

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिजवर कोरोनाचं संकट ओढावलं आहे, कारण श्रीलंकन टीममध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिजवर कोरोनाचं संकट ओढावलं आहे, कारण श्रीलंकन टीममध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिजवर कोरोनाचं संकट ओढावलं आहे, कारण श्रीलंकन टीममध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 8 जुलै : भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिजवर कोरोनाचं संकट ओढावलं आहे, कारण श्रीलंकन टीममध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. इंग्लंड दौऱ्याहून परतलेल्या श्रीलंका टीमचे बॅटिंग प्रशिक्षक ग्रान्ट फ्लॉवर (Grant Flower) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. इंग्लंडहून परतलेल्या श्रीलंका टीमच्या सगळ्या सदस्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचे रिपोर्ट समोर आल्यानंतर ग्रान्ट फ्लॉवर यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आता भारत-श्रीलंका सीरिज होणार का नाही? हा मोठा प्रश्न आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मात्र वनडे सीरिज वेळेत सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

श्रीलंका आणि इंग्लंड सीरिजनंतर इंग्लंड टीमच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं, यानंतर श्रीलंका टीमबाबतही संशयाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळेच श्रीलंकेच्या खेळाडूंना इंग्लंडहून परतल्यानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. या खेळाडूंना कोलंबोच्या हॉटेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेचे 13 खेळाडू बायो-बबलमध्ये आहेत आणि त्यांची कोरोना टेस्ट झाली आहे. भारत-श्रीलंका यांच्यातल्या वनडे सीरिजची सुरुवात 13 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहेत.

श्रीलंकेच्या खेळाडूंमध्येही कोरोनाची लक्षणं आढळली तर वनडे आणि टी-20 सीरिज संकटात येऊ शकते. ही सीरिज रद्द झाली तर श्रीलंका बोर्डाला कोट्यवधी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. भारताविरुद्धच्या सीरिजमुळे बोर्डाला 89 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते, असं श्रीलंका बोर्डाने गुरुवारीच सांगितलं.

एकीकडे श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाने प्रवेश केला असला तरी भारतीय टीम सीरिजसाठी जोरदार सराव करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजआधी (India vs Sri Lanka) भारतीय बॅट्समन फॉर्ममध्ये आले आहेत. टीम इंडियाच्या चार खेळाडूंनी इंट्रा-स्क्वॉड मॅचमध्ये अर्धशतकं केली आहेत. कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ, हार्दिक पांड्या. मनीष पांडे (Manish Pandey) आणि ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतक केलं.

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने सर्वाधिक 84 रनची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 79 रन केले. मनिष पांडे 53 रन करून आऊट झाला. ऋतुराज गायकवाडनेही 75 रन करून वनडेमध्ये आपल्या पदार्पणाचा दावा ठोकून दिला आहे.

First published:

Tags: Coronavirus, India Vs Sri lanka, Sri lanka