Home /News /sport /

IND vs SL : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले ते 8 खेळाडू कोण? राहुल द्रविडने सांगितलं

IND vs SL : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले ते 8 खेळाडू कोण? राहुल द्रविडने सांगितलं

कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली दुसरी टी-20 मॅच मंगळवारी झाली नाही. खेळाडूंची कोरोना टेस्ट केल्यानंतर बुधवारी या मॅचला सुरुवात झाली, पण कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले 8 जण आता या सीरिजला मुकणार आहेत.

पुढे वाचा ...
    कोलंबो, 28 जुलै : कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली दुसरी टी-20 मॅच मंगळवारी झाली नाही. खेळाडूंची कोरोना टेस्ट केल्यानंतर बुधवारी या मॅचला सुरुवात झाली, पण कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले 8 जण आता या सीरिजला मुकणार आहेत. श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम 20 खेळाडूंना घेऊन गेली होती, पण आता कृणाल पांड्या आणि बाकीचे 8 असे एकूण 9 खेळाडूच बाहेर झाल्यामुळे टीम इंडियाकडे 11 च खेळाडू उपलब्ध आहेत, याच खेळाडूंना घेऊन भारतीय टीम या मॅचमध्ये उतरली. दुसरी टी-20 मॅच सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. 'दुर्दैवाने कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना आता उरलेली सीरिज खेळता येणार नाही. आम्हाला निवड करायला फक्त 11 च माणसं होती, त्यामुळे त्यांचीच निवड करावी लागली. हे सगळे 11 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी लायक आहेत, म्हणूनच त्यांची टीम इंडियामध्ये निवड झाली. यांना मैदानात बघण्यासाठी मी उत्सूक आहे,' असं राहुल द्रविड म्हणाला. फक्त 11 खेळाडूच उपलब्ध असल्यामुळे टीम संतुलित नसल्याचं राहुल द्रविडने मान्य केलं. या सामन्यात टीम इंडिया फक्त 5 बॅट्समन घेऊन खेळत आहे. कृणालच्या संपर्कात कोण आलं? राहुल द्रविडने दिलेल्या या मुलाखतीनंतर कृणाल पांड्याच्या संपर्कात कोण आलं हेदेखील स्पष्ट झालं आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन, पृथ्वी शॉ, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, दीपक चहर, युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम हे 8 खेळाडू कृणाल पांड्याच्या संपर्कात आले. सीरिजचा तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे, या मॅचमध्येही हेच 11 खेळाडू मैदानात उतरतील. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय टीम शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Krunal Pandya

    पुढील बातम्या