मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराटवर होतोय कौतुकाचा वर्षाव! पण, रोहितने घेतलं दुसरंच नाव; म्हणाला असं टॅलेंट..

विराटवर होतोय कौतुकाचा वर्षाव! पण, रोहितने घेतलं दुसरंच नाव; म्हणाला असं टॅलेंट..

विराट कोहली

विराट कोहली

आजच्या सामन्या टीम इंडियाने श्रीलंकेला अवघ्या 73 धावांत गारद करून 317 धावांचा ऐतिहासिक विजय मिळवून विश्वविक्रम केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघासाठी आजचा दिवस अनेक दृष्टींनी खास होता. भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0 ने विजय मिळवत पाहुण्यांचा क्लीन स्वीप केला. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात 390 धावा केल्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेला अवघ्या 73 धावांत गारद करून 317 धावांचा ऐतिहासिक विजय मिळवत विश्वविक्रम केला. या ऐतिहासिक विजयाचा हिरो विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, कर्णधार रोहीत शर्माने याचं क्रेडीट विराटला न देता दुसऱ्याच खेळाडूला दिलं आहे. विराटने आजच्या सामन्यात तुफानी 166 धावांची खेळी केली.

या विजयानंतर टीम इंडियाच्या कर्णधाराने विराट कोहलीचे नाही तर मोहम्मद सिराजचे अधिक कौतुक केले, ज्याने 4 विकेट्स घेत श्रीलंकेचा अर्धा संघ तंबुत धाडला.

विजयानंतर रोहित म्हणाला, “ही मालिका आमच्यासाठी खूप चांगली झाली. अनेक सकारात्मक गोष्टी आमच्यात घडल्या. आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि गरज असताना विकेट्स घेतल्या. फलंदाजांनीही धावा केल्या आणि ते पाहून खूप आनंद झाला".

“त्याने (सिराज) ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यानंतर आम्ही स्लिपमध्ये फील्डिंग लावली, तो त्यास पात्र होता. त्याच्यासारखं टॅलेंट क्वचितच पाहायला मिळते, गेल्या काही वर्षांत त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे, ते पाहून खूप छान वाटते. सिराजने आपली ताकद आणखी वाढवली आहे आणि ती भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगली आहे."

वाचा - वनडेत भारताचा ऐतिहासिक विक्रम! या 6 संघांच्या नावावरही धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय

सिराज लवकरच 5 विकेट्स घेईल

तो पुढे म्हणाला, “आम्ही जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने ते जमले नाही. त्याने घेतलेल्या चार विकेट्स अप्रतिम होत्या आणि लवकरच तो पाच विकेट्स घेण्यास सक्षम असेल. त्याच्याकडे काही छान युक्त्या आहेत ज्या काम करतात आणि तुम्ही ते पाहू शकता."

भारताच्या नावे विश्वविक्रम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर नोंदवला गेला आहे. याआधी न्यूझीलंडच्या नावावर हा विशेष विक्रम नोंदवण्यात आला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना 15 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित षटकात पाच गडी गमावून 390 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 22 षटकांत अवघ्या 73 धावांत गारद झाला. अशाप्रकारे वनडे इतिहासातील धावांच्या बाबतीत ब्लू आर्मीने 317 धावांनी मोठा विजय मिळवला.

First published:

Tags: Rohit sharma, Virat kohli