मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : राहुल द्रविडची ती मागणी श्रीलंकेने फेटाळली

IND vs SL : राहुल द्रविडची ती मागणी श्रीलंकेने फेटाळली

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची (World Test Championship Final) तयारी करत आहे, तर दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) दुसरी टीम इंडिया मुंबईमध्ये क्वारंटाईन झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 जून : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची (World Test Championship Final) तयारी करत आहे, तर दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) दुसरी टीम इंडिया मुंबईमध्ये क्वारंटाईन झाली आहे. ही टीम जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) भारतीय टीमचं नेतृत्व असेल, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा प्रशिक्षक असेल. या दौऱ्यावर जाण्याआधी राहुल द्रविडने केलेली मागणी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने फेटाळून लावली आहे.

राहुल द्रविडने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजआधी सराव सामन्याचं आयोजन करण्यात यावं, अशी मागणी केली होती, पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कोरोनाचं कारण देऊन सराव सामना खेळता येणार नाही, असं सांगितलं आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाने श्रीलंका ए विरुद्ध सराव सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.

श्रीलंका बोर्डाने ही मागणी फेटाळल्यामुळे आता टीम इंडिया इन्ट्रा-स्क्वाड मॅच खेळणार असल्याचं वृत्त आहे, यामध्ये एक टी-20 आणि 2 वनडे असतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलआधी भारताने इंग्लंडमध्ये इन्ट्रा स्क्वाड मॅच खेळली.

भारत-श्रीलंका यांच्यात पहिली वनडे 13 जुलै, दुसरी वनडे 16 जुलै आणि तिसरी वनडे 18 जुलैला होईल. तर टी-20 सीरिज 21 जुलैपासून सुरू होईल. दुसरी टी-20 23 जुलैला आणि तिसरी टी-20 25 जुलैला होईल. हे सगळे सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होतील. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय टीम हे सगळे सामने खेळणार आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया

शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया

नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह

First published:

Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid, Team india