• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL : प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर द्रविडची पहिली प्रतिक्रिया, युवा खेळाडूंना म्हणाला...

IND vs SL : प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर द्रविडची पहिली प्रतिक्रिया, युवा खेळाडूंना म्हणाला...

टीम इंडिया पुढच्या महिन्यात श्रीलंकेत (India vs Sri Lanka) वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यात टीमचं नेतृत्व शिखर धवनला (Shikhar Dhawan) तर प्रशिक्षकपद राहुल द्रविडला (Rahul Dravid) देण्यात आलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : टीम इंडिया पुढच्या महिन्यात श्रीलंकेत (India vs Sri Lanka) वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यात टीमचं नेतृत्व शिखर धवनला (Shikhar Dhawan) तर प्रशिक्षकपद राहुल द्रविडला (Rahul Dravid) देण्यात आलं आहे. भारतीय टीम आणि प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही सीरिज अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या दौऱ्यावर जाण्याआधी टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासारखे युवा खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. वर्ल्ड कपसाठी खेळाडूंची निवड करणं निवड समितीचं काम आहे, पण आंतरराष्ट्रीय टीमविरुद्ध चांगली कामगिरी केल्यामुळे मदत मिळेल. जर तुम्ही या स्तरावर चांगली कामगिरी केलीत, तर नक्कीच निवड समितीचं लक्ष वेधून घ्याल,' असं राहुल द्रविड म्हणाला. तसंच 6 मॅचच्या या सीरिजमध्ये सगळ्यांना संधी देणं शक्य नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. 'टीममध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचं चांगलं मिश्रण आहे. एका प्रशिक्षकासाठी हे रोमांचक आहे, यामुळे सगळ्यांना काहीतरी शिकायची संधी आहे. प्रशिक्षक म्हणून यातून मलाही अनुभव मिळेल, तसंच शिकायची आणि सुधारायचीही संधी असेल, त्यामुळे मी उत्साही आहे,' असं द्रविडने सांगितलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रवास करणं आव्हानात्मक आहे. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, त्यामुळे बराच काळ अशापक्रारे दोन टीम खेळतील असं मला वाटत नाही, असं मत द्रविडने मांडलं. टी-20 वर्ल्ड कपआधी फक्त 3 टी-20 मॅच होणार आहेत, तसंच आयपीएलही आहे, त्यामुळे यातल्या एक किंवा दोन खेळाडूंची टीम इंडियामध्ये वर्णी लागू शकते, असे संकेत द्रविडने दिले. भारत-श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक पहिली वनडे- 13 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता दुसरी वनडे- 16 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता तिसरी वनडे- 18 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता टी-20 सीरिज पहिली टी-20 - 21 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता दुसरी टी-20- 23 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता तिसरी टी-20- 25 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता
  Published by:Shreyas
  First published: