• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND vs SL : राहुल द्रविडने 'शब्द' पाळला, सीरिजपूर्वी म्हणाला होता...

IND vs SL : राहुल द्रविडने 'शब्द' पाळला, सीरिजपूर्वी म्हणाला होता...

टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला (Rahul Dravid) श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपावण्यात आली.

  • Share this:
    कोलंबो, 28 जुलै : टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला (Rahul Dravid) श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपावण्यात आली. या दौऱ्याच्या आधी राहुल द्रविडने सगळ्या खेळाडूंना 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचमध्ये संधी देण्यात येईल, असं राहुल द्रविड म्हणाला होता. राहुल द्रविडने दौऱ्याआधी केलेलं हे वक्तव्य दुसऱ्या टी-20 वेळी खरं ठरलं. श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या 20 खेळाडूंपैकी 18 खेळाडूंना पहिल्या टी-20 पर्यंत संधी मिळाली होती. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) हे दोघंच संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत होते. दुसऱ्या टी-20 मधून या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्यासह एकूण 9 खेळाडू या सीरिजमधून बाहेर झाले, त्यानंतर टीम इंडियाला निवड करण्यासाठी फक्त 11 खेळाडूच होते, त्यामुळे या सगळ्या खेळाडूंना घेऊन खेळण्याशिवाय टीमला गत्यंतर नव्हतं. सूर्यकुमार यादव, इशान किशन, पृथ्वी शॉ, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, दीपक चहर, युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम हे 8 खेळाडू कृणाल पांड्याच्या संपर्कात आले. सीरिजचा तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे, या मॅचमध्येही हेच 11 खेळाडू मैदानात उतरतील. काय म्हणाला राहुल द्रविड? दुसरी टी-20 मॅच सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. 'दुर्दैवाने कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना आता उरलेली सीरिज खेळता येणार नाही. आम्हाला निवड करायला फक्त 11 च माणसं होती, त्यामुळे त्यांचीच निवड करावी लागली. हे सगळे 11 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी लायक आहेत, म्हणूनच त्यांची टीम इंडियामध्ये निवड झाली. यांना मैदानात बघण्यासाठी मी उत्सूक आहे,' असं राहुल द्रविड म्हणाला. फक्त 11 खेळाडूच उपलब्ध असल्यामुळे टीम संतुलित नसल्याचं राहुल द्रविडने मान्य केलं. या सामन्यात टीम इंडिया फक्त 5 बॅट्समन घेऊन खेळत आहे. अशी आहे भारतीय टीम शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती
    Published by:Shreyas
    First published: