भारत-श्रीलंका पहिली कसोटी गेली 'पाण्यात', सामना अनिर्णित !

भारत-श्रीलंका पहिली कसोटी गेली 'पाण्यात', सामना अनिर्णित !

कॅप्टन विराट कोहलीने नाबाद 104 धावांची खेळी करून टीम इंडियाने श्रीलंकेला पाचव्या दिवशी 352 धावांवर डाव घोषित केला

  • Share this:

20 नोव्हेंबर : पाऊस आणि खराब वातावरणामुळे अडथळलेली कोलकाता टेस्ट मॅच अखेर ड्रा झालीये. मॅचच्या अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजानी विजय खेचण्याचा प्रयत्न केला पण खराब वातावरणामुळे भारताच्या विजयावर पाणी फेरलं गेलं.

कॅप्टन विराट कोहलीने नाबाद 104 धावांची खेळी करून टीम इंडियाने श्रीलंकेला पाचव्या दिवशी 352 धावांवर डाव घोषित केला. भारताने श्रीलंकेला 231 धावांचं लक्ष्य दिलं होतं. 231 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकनं टीमची भारतीय गोलंदाजांनी धुळदाण उडवली.

भारताने पहिल्या इनिंगमध्ये 172 धावांची खेळी केली. याला उत्तर देत लंकनं टीमने 294 धावा करून 122 धावांची आघाडी घेतली. पहिल्या इनिंगमध्ये लंकनं टीमचं पारडं जड होतं. पण दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय ओपनिंग जोडीने धडाकेबाज बॅटिंग करून लंकनं टीमच्या अपेक्षेवर पाणी फेरलं.

चौथ्या दिवशी खेळं संपला तेव्हा टीम इंडियाच्या दुसऱ्या इनिंगचा स्कोअऱ 1 बाद 171 धावा असा होता. मॅचच्या पाचव्या दिवशी  केएल राहुल 79 धावा करून बाद झाला. भारताने 352 धावांचा डोंगर उभा केला.

दुसरी इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या लंकनं टीमची सुरुवात खराब राहिली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे लंकनं टीम ढेर झाली. भुवनेश्वर कुमारने लंकनं टीमच्या इनिंगला सुरुंग लावत 4 गडी बाद केले. तर मोहम्मद शामीने 2 गडी बाद केले. श्रीलंकेची अवस्था 75 धावांवर 7 गडी बाद अशी होती. भारत विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण खराब वातावरणामुळे मॅच ड्रा करावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 08:59 PM IST

ताज्या बातम्या