मुंबई, 9 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वन-डे मालिका 13 जुलैपासून सुरू होणार होती. मात्र पुन्हा एकदा मालिकेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. श्रीलंकाचे बॅटिंग कोच आणि परफॉमन्स विश्लेषक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेमध्ये 13 जुलै पासून सुरू होणारी वन-डे मालिकेेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यासोबतच टी20 मालिकांमध्येही बदल करण्यात आला आहे.
सुरुवातील या दोन्ही टीममध्ये 13 जुलैपासून वन-डे मालिकाची सुरुवात होणार होती. मात्र आता शेड्यूलमध्ये बदल करण्यात आला आहे. गुरुवारी श्रीलंकेच्या टीमचे बॅटींग कोच ग्रँट फ्लॉवर (Grant Flower) यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज श्रीलंकाचे बॅटिंग कोच आणि परफॉमन्स विश्लेषक शिरांथा निरोशन यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वनडे आणि टी20 मालिकेच्या शेड्यूलमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता वनडे मालिकेचा पहिला सामना 17 जुलै रोजी खेळला जाईल. तर दुसरा आणि तिसरा वनडे सामना 19 आणि 21 जुलै रोजी आयोजित कण्यात येणार आहे. तर टी20 मालिकेची सुरुवात 21 जुलैच्या ऐवजी आता 24 जुलैपासून होणार आहे.
पाहा नवीन शेड्यूल
वनडे मालिकाचे सामने
पहिला वनडे- 17 जुलै
दूसरा वनडे- 19 जुलै
तिसरा वनडे- 21 जुलै
टी20 मालिकाचे सामने
पहिला टी20- 24 जुलै
दुसरा टी20- 25 जुलै
तिसरा टी20- 27 जुलै
भारताविरुद्ध नवा कॅप्टन
29 वर्षाचा शनाका आक्रमक बॅट्समन आणि फास्ट बॉलर आहे. तो गेल्या चार वर्षातील श्रीलंकेचा सहावा कॅप्टन असेल. यापूर्वी दिनेश चंदिमल, अँजलो मॅथ्यूज, लसिथ मलिंगा, दिमूथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यांनी श्रीलंकेचं नेतृत्तव केलं आहे. शनाकाने यापूर्वी 2019 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 3 टी20 मॅचमध्ये कॅप्टनसी सांभाळली होती. ती मालिका श्रीलंकेनं 3-0 अशी जिंकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.