Home /News /sport /

IND vs SL : श्रीलंका दौऱ्याआधी खेळाडूंना सगळ्यात मोठा दिलासा, BCCI चा महत्त्वाचा निर्णय

IND vs SL : श्रीलंका दौऱ्याआधी खेळाडूंना सगळ्यात मोठा दिलासा, BCCI चा महत्त्वाचा निर्णय

जुलै महिन्यामध्ये टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) जाणार आहे. यासाठीच्या टीमची बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी घोषणा केली. भारतीय टीमचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे या दौऱ्यात नवोदितांना संधी देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 जून : जुलै महिन्यामध्ये टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) जाणार आहे. यासाठीच्या टीमची बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी घोषणा केली. भारतीय टीमचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे या दौऱ्यात नवोदितांना संधी देण्यात आली आहे. टीमचं नेतृत्व शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) आहे, तर फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) उपकर्णधार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू मुंबईत दाखल व्हायला लागले आहेत. खेळाडूंना मुंबईत 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. यानंतरच ते श्रीलंकेला रवाना होतील. श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळेल. राहुल द्रविड (Rahul Dravid) या टीमचा प्रशिक्षक असणार आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट होणार नाही. कोरोनामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे खेळाडू यो-यो टेस्ट आणि 2 किमी रेसशिवाय श्रीलंकेला जातील. भारतीय टीममध्ये मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची (Varun Chakravarthy) निवड करण्यात आली आहे. या आधी दोनवेळा वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला होता, त्यामुळे त्याला टीमबाहेर जावं लागलं होतं. पण आता फिटनेस टेस्टच होणार नसल्यामुळे त्याचासाठी हा दिलासा आहे. भारत-श्रीलंका यांच्यात पहिली वनडे 13 जुलै, दुसरी वनडे 16 जुलै आणि तिसरी वनडे 18 जुलैला होईल. तर टी-20 सीरिज 21 जुलैपासून सुरू होईल. दुसरी टी-20 23 जुलैला आणि तिसरी टी-20 25 जुलैला होईल. हे सगळे सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होतील. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, India Vs Sri lanka, Team india

    पुढील बातम्या