कोलंबो, 19 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 7 विकेटने दणदणीत विजय झाला. याचसोबत 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan), इशान किशनचं (Ishan Kishan) अर्धशतक आणि पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) आक्रमक बॅटिंगमुळे श्रीलंकेने ठेवलेलं आव्हान भारताने अगदी सहज पूर्ण केलं. त्याआधी टीम इंडियाच्या स्पिन बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी करत 262 रनवर रोखलं, यात कृणाल पांड्याने (Krunal Pandya) मोलाची भूमिका बजावली. कृणाल पांड्याच्या कामगिरीसोबतच त्याच्या मैदानातल्या वर्तणुकीचंही सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
श्रीलंकेची बॅटिंग सुरू असताना 22 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला ही घटना घडली. श्रीलंकेचा स्कोअर 106/3 असताना धनंजया डिसिल्वा आणि असलंका मैदानात होते आणि कृणाल बॉलिंग करत होता. स्ट्राईक वर असलेल्या डिसिल्वाने सरळ वेगाने शॉट मरला. हा बॉल कृणालने अडवला. बॉल अडवत असताना कृणालचा धक्का चुकून असलंकाला लागला, यानंतर कृणाल त्याच्याजवळ गेला आणि मिठी मारली. कृणाल पांड्याच्या या वर्तणुकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Upholding the Spirit of Cricket! Lovely gesture by Krunal
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 1 (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/QYC4z57UgI) now! #SLvINDOnlyOnSonyTen #HungerToWin #KrunalPandya pic.twitter.com/REg3TB2Yu9 — Sony Sports (@SonySportsIndia) July 18, 2021
कृणाल पांड्याच्या या कृतीचं अनेकांनी समर्थन केलं, तसंच काहींनी हा कोच राहुल द्रविडमुळे आलेला फरक असल्याचंही सांगितलं.
The discipline, love and care for opponent under Rahul Dravid. pic.twitter.com/U9I8GHpP4Y
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 18, 2021
When Rahul Dravid is your coach #SLvIND #Dravid #Cricket pic.twitter.com/AT55waPAMf
— India Fantasy (@india_fantasy) July 18, 2021
Rahul Dravid in team meetings: Please go and hug your opponents. https://t.co/Iz4AX39POd
— Sameer Allana (@HitmanCricket) July 18, 2021
क्रिकेटच्या मैदानात कृणाल पांड्या अनेकवेळा वादात राहिला. काहीच दिवसांपूर्वी क्रिकेटपटू दीपक हुड्डा याने बडोद्याची आपली स्थानिक रणजी टीम सोडण्याचा निर्णय घेतला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवेळी एकाच टीमकडून खेळणाऱ्या दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या यांच्यात वाद झाले होते, यानंतर हुड्डाने स्पर्धेतून माघार घेतली. पुढे बडोदा क्रिकेट असोसिएशनने हुड्डावर कारवाई करत संपूर्ण मोसमासाठी त्याचं निलंबन केलं होतं. कृणाल पांड्याने आपल्याला शिव्या दिल्या, त्यामुळे आपण स्पर्धेतून माघार घेत आहोत, असा आरोप दीपक हुडाने केला.
भारत-इंग्लंड यांच्यात या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सीरिजवेळी आणि आयपीएलमध्येही कृणाल पांड्याच्या वर्तनावरून टीका करण्यात आली होती. फिल्डरकडून झालेल्या चुकीमुळे कृणाल पांड्या मैदानातच भडकल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यावेळी चाहत्यांनी कृणालला सुनावलं होतं.
कृणालची उत्कृष्ट कामगिरी
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये कृणाल पांड्याने उत्कृष्ट कामगिरी केली. 10 ओव्हरमध्ये त्याने फक्त 26 रन दिले आणि एक विकेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India Vs Sri lanka, Krunal Pandya