मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : टी-20 मध्ये पहिल्या बॉलला फोर, वनडेमध्ये सिक्स, पदार्पणाच्या दोन्ही मॅचमध्ये अर्धशतकं

IND vs SL : टी-20 मध्ये पहिल्या बॉलला फोर, वनडेमध्ये सिक्स, पदार्पणाच्या दोन्ही मॅचमध्ये अर्धशतकं

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची (India vs Sri Lanka) वनडे सीरिजने (ODI Series) सुरुवात झाली आहे. पहिल्या वनडेमध्ये भारतीय बॉलर्सनी श्रीलंकेला 262 रनवर रोखलं, यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

कोलंबो, 18 जुलै : टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची (India vs Sri Lanka) वनडे सीरिजने (ODI Series) सुरुवात झाली आहे. पहिल्या वनडेमध्ये भारतीय बॉलर्सनी श्रीलंकेला 262 रनवर रोखलं, यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली. या दोन ओपनरनी टीमला 5.3 ओव्हरमध्येच 58 रन केले, पण पृथ्वी शॉ 24 बॉलमध्ये 43 रन करून आऊट झाला. यानंतर इशान किशन (Ishan Kishan) बॅटिंगला आला. आपली पहिलीच वनडे मॅच खेळणाऱ्या इशान किशनने पहिला बॉल सिक्स आणि दुसऱ्या बॉलला फोर मारली. तसंच पहिल्या टी-20 प्रमाणेच पहिल्या वनडेमध्येही इशान किशनने वादळी अर्धशतक केलं. 33 बॉलमध्ये त्याने अर्धशतकाला गवसणी घातली.

धनंजया डि सिल्वाच्या (Dhananjaya De Silva) बॉलिंगवर इशान किशनने पहिल्याच बॉलवर सिक्स आणि दुसऱ्या बॉलवर फोर मारत 2 बॉलमध्येच 10 रन केले. याआधी वर्षाच्या सुरुवतीला इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) दुसऱ्या टी-20 मधून इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला बॉल जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) खेळला. या बॉलवर त्याने फोर मारत आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दिमाखात सुरुवात केली. यानंतर आता वनडे क्रिकेटमध्येही त्याने याची पुनरावृत्ती केली.

इशान किशनने इंग्लंडविरुद्धच्या आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात 32 बॉलमध्ये 56 रन केले, यामध्ये 5 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. इशान किशनने 175 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली होती.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Ishan kishan