Home /News /sport /

IND vs SL : अखेर संजू सॅमसनला मिळणार संधी? पंत नाही तर 'या' खेळाडूला विराट बसवणार बाहेर

IND vs SL : अखेर संजू सॅमसनला मिळणार संधी? पंत नाही तर 'या' खेळाडूला विराट बसवणार बाहेर

प्रत्येक आयपीएलमध्ये संजू सॅमसनची चर्चा होते, मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळत नाही. विकेटकिपींगबरोबरच संजू आक्रमक फलंदाजीही करतो. मात्र वेस्ट इंडिज विरोधात संजूच्या नावाचा विचार केला गेला नाही.

प्रत्येक आयपीएलमध्ये संजू सॅमसनची चर्चा होते, मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळत नाही. विकेटकिपींगबरोबरच संजू आक्रमक फलंदाजीही करतो. मात्र वेस्ट इंडिज विरोधात संजूच्या नावाचा विचार केला गेला नाही.

आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विराट भारतीय संघात मोठे बदल करू शकतो.

    इंदूर, 07 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यात सध्या तीन टी-20 सामन्यांची मालिका होत आहे. यातील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं सर्वांचे लक्ष आज इंदूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्याकडे आहे. दरम्यान या मालिकेत रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळं भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्यामुळं दुखापतीमधून सावरत असलेल्या शिखर धवनला पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. मात्र असे असले तरी, शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनला संघात स्थान मिळू शकते. संजू सॅमसनला गेल्या तीन मालिकांमध्ये संधी मिळाली नव्हती. बांगलादेश, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध संजूला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळं या मालिकेत संजूला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र पहिल्या सामन्यात टॉस झाल्यानंतर विराटनं सांगितलेल्या संघात संजूचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र चाहते संजूला खेळताना पाहण्यास उत्सुक आहेत. वाचा-हेअर ड्रायर आणि इस्त्री वापरणाऱ्यांवर भडकला गांगुली, BCCI करणार कारवाई धवनच्या जागी संजूला संधी देण्याची गंभीरनं केली होती मागणी स्टार स्पोर्ट्ससोबत झालेल्या चर्चेत गौतम गंभीरनं, 'वेस्ट इंडीज आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसनला संधी देण्यात आली नव्हती. मात्र त्याला श्रीलंकेविरुद्ध संधी मिळायला हवी. माझ्या मते टीम इंडियाने त्याला सलामीला संधी द्यायला हरकत नाही. त्याचबरोबर ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात यावे. जर 5 ते 6 षटके शिल्लक असतील तर पंत चौथ्या क्रमांकावर आला पाहिजे, असे सांगितले होते’ वाचा-गोलंदाजाची बॉलिंग पाहून घाबरला फलंदाज अन् टाकली विकेट, VIDEO VIRAL धवन विरोधात आहेत अनेक दिग्गज खेळाडू सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धवन जखमी झाला होता. त्यामुळं त्याला वेस्ट इंडिज मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर आता रोहितला विश्रांती देण्यात आल्यामुळं धवनला पुन्हा संघात जागा मिळाली आहे. त्यामुळं धवनला राहुलबरोबर सलामीला उतरू शकतो. असे असले तरी धवनच्या खेळीवर दिग्गज क्रिकेटपटू खूश नाही आहेत. गौतम गंभीरआधी भारताचे माजी निवडकर्ता के. श्रीकांत यांनी धवन टी -२० स्वरूपात बसत नाही, असे सांगितले होते. वाचा-'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमलं स्टेडियम, अभिमान वाटावा असा VIDEO धवनचा टॉ20 फॉर्म खराब शिखर धवनसाठी टी-20 फॉरमॅट विशेष चांगला राहिलेला नाही. 2019 नोव्हेंबरपासून धवननं एकही अर्धशतकी खेळी केलेली नाही आहे. गेल्या वर्षात ऑस्‍ट्रेलिया, न्‍यूझीलंड, वेस्‍टइंडीज, साउथ आफ्रीका आणि बांगलादेशविरुद्धही त्याला अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. 2019मध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोअर 41 होता. वाचा-ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्या 50 कोटी प्राण्यांसाठी दिग्गज खेळाडू विकणार टोपी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या