Home /News /sport /

IND vs SL : पावसामुळं नवीन वर्षातील पहिली टी-20 गेली पाण्यात, भारत-श्रीलंका सामना रद्द

IND vs SL : पावसामुळं नवीन वर्षातील पहिली टी-20 गेली पाण्यात, भारत-श्रीलंका सामना रद्द

भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या 6 द्विपक्षीय टी20 मालिकेत श्रीलंकेला एकदाही भारताला नमवता आलेले नाही.

    गुवाहटी, 05 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिलाच टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पिच ओले असल्यामुळं पंचांनी हा निर्णय घेतला. त्यामुळं एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करण्यात आला. आता दुसरा सामना 7 जानेवारी रोजी इंदूरला होणार आहे. दरम्यान, या सामन्यात भारतानं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सामना सुरू होण्याआधीच मुसळधार पावसामुळं सामन्याला विलंब झाला. अखेर पंचांनी हा सामना रद्द झाल्याचे जाहीर केले. या मालिकेतून दोन-तीन महिन्यांपासून संघात नसलेला जसप्रीत बुमराह कमबॅक करणार आहे. तर, या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजने 18 महिन्यांनंतर श्रीलंका संघात पुनरागमन केले आहे. लसिथ मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेच्या संघाकडून त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील टक्कर भारत-श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 2009पासून एकूण 16 टी-20 सामने झाले आहेत. यातील 11 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर 5 सामन्यात श्रीलंकेनं बाजी मारली आहे. मुख्य म्हणजे भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या 6 द्विपक्षीय टी20 मालिकेत श्रीलंकेला एकदाही भारताला नमवता आलेले नाही. मोडला जाऊ शकतो अश्विनचा विक्रम भारताकडून टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अद्याप फिरकीपटू आर अश्विनच्या नावावर आहे. अश्विनच्या नावावर 52 टी -20 विकेट घेण्याचा विक्रम आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने त्याची बरोबरी केली आहे पण त्याला मागे टाकता आले नाही. चहलने अवघ्या 36 टी -20 सामन्यांत 52 विकेट घेतल्या आहेत. अश्विननं हा विक्रम 46 सामन्यात केला आहे. विराट टाकणार रोहितला मागे आंतरराष्ट्रीय टी -20मध्ये सध्या विराट आणि रोहित सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. याक्षणी विराट आणि रोहित टी -20मध्ये बरोबरीत आहेत. विराटने 75 सामन्यांत 2633 धावा केल्या आहेत तर रोहितने 104 सामन्यात 2633 धावा केल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत विराट रोहितला एक धाव काढताच मागे टाकणार आहे. भारतीय संघ- शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी. श्रीलंका: लसिथ मलिंगा (कर्णधार), धनुष्का गुणतिलक, अविष्का फर्नांडो, एंजेलो मैथ्यूज, दासुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डि सिल्वा, इसुरु उडाना, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, वानिंदु हसरंगा, लाहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षण संदाकन आणि कसुन राजिता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या