Home /News /sport /

IND vs SL: टीम इंडियाच्या माजी कोचचा पृथ्वी शॉला SMS, म्हणाला...

IND vs SL: टीम इंडियाच्या माजी कोचचा पृथ्वी शॉला SMS, म्हणाला...

पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात (India vs Sri Lanka) आक्रमक बॅटिंग केली. 24 बॉलमध्ये 43 रन करून शॉ आऊट झाला, त्याच्या या खेळीमध्ये 9 फोरचा समावेश होता.

    कोलंबो, 20 जुलै: पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात (India vs Sri Lanka) आक्रमक बॅटिंग केली. 24 बॉलमध्ये 43 रन करून शॉ आऊट झाला, त्याच्या या खेळीमध्ये 9 फोरचा समावेश होता. शॉने केलेल्या आक्रमक सुरुवातीमुळे टीम इंडियाची आक्रमक सुरुवात झाली आणि भारताने हा सामना 80 बॉल शिल्लक असताना जिंकला. पृथ्वी शॉची ही बॅटिंग बघून टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल (Greg Chappell) खूश झाले आहेत. चॅपल यांनी शॉच्या सुधारलेल्या तंत्राचंही कौतुक केलं. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेग चॅपल यांनी पृथ्वी शॉच्या बॅटिंगच्या हायलाईट्स बघितल्या आणि त्याला एसएमएसही केला. बॉल खेळण्याआधी शॉच्या हालचालींमुळे ग्रेग चॅपल प्रभावित झाले. 'हाय पृथ्वी, मी श्रीलंकेविरुद्ध तुझ्या बॅटिंगच्या हायलाईट्स बघितल्या. तू जबरदस्त बॅटिंग केलीस. तुझ्या सुरुवातीच्या हालचाली एकदम योग्य होत आहेत. त्यामुळे तुला बॉल चांगल्या पद्धतीने खेळता येत आहेत. खासकरून फूल लेंथ बॉल. तू बॉल खेळण्यासाठी योग्य जागेवर येत आहेस आणि तुझा बॅट स्विंगही आधीपेक्षा चांगला झाला आहे,' असं चॅपल या मेसेजमध्ये म्हणाले. 'जर तू 22 रनवर असताना खेळलेला ड्राईव्ह साईड-ऑन एँगलने बघितलास तर नीट लक्षात येईल. तूला आधीपासूनच फूल लेंथ बॉल येईल हे माहिती होतं आणि यासाठी तू तयार होतास. त्यामुळे ज्या बॉलवर विकेट मिळण्याची शक्यता जास्त असते त्यावर तूला शॉट मारता आले. तुम्ही अशा बॉलवर शॉट मारायला सुरुवात केली की बॉलरलाही आपली लेंथ छोटी करावी लागते आणि तुम्हाला बॅकफूटवरून शॉट मारण्याची संधी मिळते,' असं चॅपल यांनी सांगितलं. पृथ्वी शॉने त्याच्या डोक्यात आधीपासूनच हालचालीची रणनिती आखली आहे, जे पाहून समाधान वाटलं, असं वक्तव्य चॅपल यांनी केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Prithvi Shaw

    पुढील बातम्या