मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : एका जागेसाठी दोन खेळाडूंमध्ये रेस, धवन-द्रविड कोणाला संधी देणार?

IND vs SL : एका जागेसाठी दोन खेळाडूंमध्ये रेस, धवन-द्रविड कोणाला संधी देणार?

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजची सुरुवात रविवारपासून होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेयिंग इलेव्हन जवळपास निश्चित असली तरी एक जागा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 17 जुलै : भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजची सुरुवात रविवारपासून होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेयिंग इलेव्हन जवळपास निश्चित असली तरी एक जागा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. पहिल्या सामन्यात विकेट कीपर म्हणून संजू सॅमसनला (Sanju Samson) खेळवायचं का इशान किशनला (Ishan Kishan) याबाबतचा निर्णय घेताना टीमला अडचण येणार आहे.

इशान किशनला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 टीममध्ये संधी मिळाली. आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करून इशान किशनने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. तर संजू सॅमसनला भारतीय टीममध्ये बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. अतिआक्रमक बॅटिंग केल्यामुळे संजू सॅमसनला टीममधून बाहेर करण्यात आलं. 7 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 11.8 च्या सरासरीने 83 रन केले. तर इशान किशनने 2 टी-20 सामन्यांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने 60 रन केले.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. सॅमसनला संधी दिली तर हे त्याचं वनडे क्रिकेटमधलं पदार्पण असेल. संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्येही आहे. आयपीएल 2021 मध्ये त्याने 7 मॅचमध्ये 46.16 च्या सरासरीने 277 रन केले, यात एका शतकाचाही समावेश आहे.

इशान किशनचा खराब फॉर्म

आयपीएल 2021 मध्ये इशान किशनला संघर्ष करावा लागला. या डावखुऱ्या बॅट्समनने 5 मॅचमध्ये फक्त 14.60 च्या सरासरीने 73 रन केले. इशान किशनचा हा फॉर्म बघता टीम संजू सॅमसनवर विश्वास दाखवू शकते.

पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य टीम

शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर

First published:
top videos

    Tags: Cricket, India Vs Sri lanka