मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे खेळाडू टीमबाहेर

IND vs SL : पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे खेळाडू टीमबाहेर

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेने (India vs Sri Lanka) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने टॉसवेळी सगळ्यांनाच धक्का दिला. या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसन (Sanju Samson) याला संधी दिली जाईल, असं बोललं जात होतं. पण आयपीएलमध्ये संघर्ष करणाऱ्या इशान किशन (Ishan Kishan) याला खेळवण्यात आलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

कोलंबो, 18 जुलै : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेने (India vs Sri Lanka) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंकेविरुद्ध नवोदितांना संधी देण्यात आली आहे. असं असलं तरी टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने टॉसवेळी सगळ्यांनाच धक्का दिला. या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसन (Sanju Samson) याला संधी दिली जाईल, असं बोललं जात होतं. पण आयपीएलमध्ये संघर्ष करणाऱ्या इशान किशन (Ishan Kishan) याला खेळवण्यात आलं. याबाबत अनेकांना आश्चर्यही वाटलं, पण आता संजू सॅमसनला बाहेर का ठेवण्यात आलं, याचं कारण समोर आलं आहे.

सराव सुरू असताना संजू सॅमसनच्या गुडघ्याच्या मांसपेशींना दुखापत झाली, त्यामुळे तो पहिल्या वनडेमध्ये खेळू शकला नाही. भारतीय टीममधले वैद्यकीय अधिकारी सॅमसनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी-20 खेळणार आहे.

बीसीसीआयने संजू सॅमसनच्या दुखापतीविषयी माध्यमांना माहिती दिली. 'संजू सॅमसनच्या गुडघ्याच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आहेत, त्यामुळे तो पहिल्या वनडेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. वैद्यकीय टीम त्याच्यावर उपचार करत आहे,' असं बीसीसीआयने (BCCI) सांगितलं.

संजू सॅमसनची दुखापत टीम इंडियासाठी धक्का आहे, कारण तो आक्रमक बॅट्समन आहे, तसंच फॉर्ममध्येही आहे. टीमसोबतच त्याला स्वत:लाही आपण लवकरात लवकर फिट व्हावं, असं वाटत असेल. संजू सॅमसनने टीम इंडियाकडून 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

सूर्या-किशनचं पदार्पण

सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. आधी वर्षाच्या सुरुवातीला या दोघांनी एकाच सामन्यातून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्येही पाऊल टाकलं होतं. अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले. योगायोग म्हणजे दोघांनी आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये अर्धशतकी खेळी केली होती.

पहिल्या सामन्यामध्ये इशान किशनला बॅटिंगची संधी मिळाली तेव्हा त्याने अर्धशतक केलं, पण सूर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यात बॅटिंगच मिळाली नाही. अखेर दुसऱ्या सामन्यात बॅटिंग मिळाली तेव्हा त्यानेही अर्धशतक केलं होतं.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Ishan kishan, Sanju samson