Home /News /sport /

IND vs SL Live Streaming : भारत-श्रीलंका वनडे कुठे आणि कधी पाहाल?

IND vs SL Live Streaming : भारत-श्रीलंका वनडे कुठे आणि कधी पाहाल?

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजला 18 जुलै म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) टीम इंडियाचं नेतृत्व असेल.

    कोलंबो, 17 जुलै : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजला 18 जुलै म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) टीम इंडियाचं नेतृत्व असेल. तो पहिल्यांदाच टीम इंडियाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून 24 जणांनी नेतृत्व केलं आहे, त्यामुळे हा रेकॉर्ड करणारा धवन 25 वा भारतीय खेळाडू असेल. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) शिखर धवनसोबत इनिंगची सुरुवात करताना दिसण्याची शक्यता आहे. शॉला यावर्षाच्या सुरुवातीला टेस्ट टीममधून बाहेर करण्यात आलं होतं. टीममधून बाहेर झाल्यानंतर शॉने स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. या दौऱ्यात मधल्या फळीत सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) कामगिरीवरही सगळ्यांचं लक्ष असेल. गेल्या काही वर्षांपासून सूर्यकुमार आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. तसंच इंग्लंडविरुद्धच्या आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये त्याने अर्धशतक केलं होतं. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांच्यासाठीही हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण गेल्या दोन वर्षांमध्ये दोघांना संघर्ष करावा लागला आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली वनडे 18 जुलैला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. रविवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होईल. भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. भारत-श्रीलंका सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह वर बघता येईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka

    पुढील बातम्या