मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL: दोन वर्षांनंतर टीम इंडियाची 'मॅच विनर' जोडी मैदानात, पहिल्याच बॉलला विकेट

IND vs SL: दोन वर्षांनंतर टीम इंडियाची 'मॅच विनर' जोडी मैदानात, पहिल्याच बॉलला विकेट

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेने (India vs Sri Lanka) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात तब्बल दोन वर्षांनी टीम इंडियाची मॅच विनर जोडी कुल-चा पुन्हा एकदा मैदानात एकत्र उतरले. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांनी 2019 वर्ल्ड कपमध्ये एकत्र अखेरची मॅच खेळली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

कोलंबो, 18 जुलै: भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेने (India vs Sri Lanka) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात तब्बल दोन वर्षांनी टीम इंडियाची मॅच विनर जोडी कुल-चा पुन्हा एकदा मैदानात एकत्र उतरले. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांनी 2019 वर्ल्ड कपमध्ये एकत्र अखेरची मॅच खेळली होती. यानंतर दोघांना एकदाही टीममध्ये एकत्र खेळवण्यात आलं नव्हतं.

2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचं टीम इंडियामध्ये पदार्पण झालं. यानंतर पुढची दोन वर्ष या दोघांनी मागे वळून पाहिलं नाही. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये या दोघांनी भरपूर विकेट घेत भारताला अनेक विजय मिळवून दिले. 2019 वर्ल्ड कपनंतर मात्र दोघांचा फॉर्म ढासळला, तसंच ऑलराऊंडर असलेल्या रवींद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) धमाकेदार कामगिरी करत टीममध्ये पुनरागमन केलं, त्यामुळे कुलदीप आणि चहल यांना एकत्र खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच बॉलला विकेट घेतली. 10 व्या ओव्हरमध्ये कर्णधार शिखर धवनने चहलच्या हातात बॉल दिला, यानंतर पहिल्याच बॉलला त्याने 32 रनवर खेळणाऱ्या आविष्का फर्नांडोला 32 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मनिष पांडेने फर्नांडोचा कॅच पकडला.

2019 वर्ल्ड कपनंतर कुलदीप यादवला फार संधी मिळाली नाही. आयपीएलमध्येही (IPL) कोलकात्याच्या (KKR) टीममध्ये कुलदीपला बाहेरच बसवलं गेलं. वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध एक टेस्ट आणि दोन वनडेमध्ये कुलदीप खेळला, पण त्याला खास कामगिरी करता आली नाही. तर चहल इंग्लंडविरुद्धच्या 3 टी-20 मध्ये खेळला आणि त्याला 3 विकेट मिळाल्या. वनडे सीरिजमध्ये मात्र त्याला संधी मिळाली नाही.

कुलदीपने या मॅचआधी आपल्या करियरमध्ये 7 टेस्ट, 63 वनडे आणि 21 टी-20 खेळल्या. त्याच्या नावावर टेस्टमध्ये 26, वनडेमध्ये 105 आणि टी-20 मध्ये 39 विकेट आहेत. तर चहलने 54 वनडेमध्ये 92 विकेट आणि 48 टी-20 मध्ये 62 विकेट घेतल्या. चहलला अजून टेस्ट क्रिकेटमध्ये खेळायची संधी मिळाली नाही.

First published:

Tags: Cricket, India Vs Sri lanka, Kuldeep yadav, Yuzvendra Chahal