• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL: द्रविडचा फेवरेट टीममध्ये नाही, मुंबई इंडियन्सच्या स्टारवर धवनने टाकला विश्वास

IND vs SL: द्रविडचा फेवरेट टीममध्ये नाही, मुंबई इंडियन्सच्या स्टारवर धवनने टाकला विश्वास

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या पहिल्या वनडेला (First ODI) कोलंबोमध्ये सुरुवात झाली आहे. या सामन्यातून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

 • Share this:
  कोलंबो, 18 जुलै: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या पहिल्या वनडेला (First ODI) कोलंबोमध्ये सुरुवात झाली आहे. या सामन्यातून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. या सामन्यात इशान किशनला संधी दिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इशान किशनऐवजी विकेट कीपर म्हणून संजू सॅमसनला (Sanju Samson) खेळवलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) इशान किशनला संधी देत सगळ्यांना धक्का दिला. टीम इंडियातल्या सगळ्याच नवोदित खेळाडूंप्रमाणे संजू सॅमसनही राहुल द्रविडच्याच (Rahul Dravid) पठडीत तयार झालेला खेळाडू आहे. 2013 साली संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या ट्रायलसाठी गेला होता, त्यावेळी द्रविड संजू सॅमसनची बॅटिंग बघून खूश झाला. एवढच नाही तर द्रविडने त्याला माझ्या टीमकडून खेळशील का? असा सवालही विचारला. खुद्द संजू सॅमसननेच हा किस्सा सांगितला. अंडर-19 आणि इंडिया-एमध्ये खेळणारे सगळेच खेळाडू द्रविडच्या मार्गदर्शनातून जातात. मलाही त्यांच्याकडून प्रशिक्षण मिळालं, त्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो, असं संजू सॅमसन म्हणाला. पहिल्या वनडेसाठी संजू सॅमसनला निवडायचं का इशान किशनला याचा निर्णय घेताना शिखर धवन आणि राहुल द्रविड यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागला. इशान किशनला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 टीममध्ये संधी मिळाली. आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करून इशान किशनने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. तर संजू सॅमसनला भारतीय टीममध्ये बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. अतिआक्रमक बॅटिंग केल्यामुळे संजू सॅमसनला टीममधून बाहेर करण्यात आलं. 7 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 11.8 च्या सरासरीने 83 रन केले. तर इशान किशनने 2 टी-20 सामन्यांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने 60 रन केले. संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्येही आहे. आयपीएल 2021 मध्ये त्याने 7 मॅचमध्ये 46.16 च्या सरासरीने 277 रन केले, यात एका शतकाचाही समावेश आहे. इशान किशनचा खराब फॉर्म आयपीएल 2021 मध्ये इशान किशनला संघर्ष करावा लागला. या डावखुऱ्या बॅट्समनने 5 मॅचमध्ये फक्त 14.60 च्या सरासरीने 73 रन केले. इशान किशनचा हा फॉर्म बघता टीम संजू सॅमसनवर विश्वास दाखवू शकते.
  Published by:Shreyas
  First published: