मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : पहिल्या वनडेमध्ये अशी असणार खेळपट्टी, हे खेळाडू चमकणार!

IND vs SL : पहिल्या वनडेमध्ये अशी असणार खेळपट्टी, हे खेळाडू चमकणार!

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली पहिली वनडे रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. या मैदानतल्या खेळपट्टीच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर पहिल्या वनडेमध्ये मोठा स्कोअर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बॉलर्सना कठोर मेहनत करावी लागणार, असंच चित्र आहे.

पुढे वाचा ...

कोलंबो, 17 जुलै : भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली पहिली वनडे रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. या मैदानतल्या खेळपट्टीच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर पहिल्या वनडेमध्ये मोठा स्कोअर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बॉलर्सना कठोर मेहनत करावी लागणार, असंच चित्र आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी-20 खेळणार आहे. या सगळ्या मॅच याच मैदानात होणार आहेत. शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडमध्ये असल्यामुळे धवनकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रेमदासा स्टेडियममध्ये अखेरच्या 10 वनडेमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा सरासरी स्कोअर 285 रन आहे, यातल्या दोन मॅचमध्ये 350 पेक्षा जास्त स्कोअर झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा स्कोअर होण्याची शक्यता आहे. मागच्या 10 मॅचपैकी 6 मॅच पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकल्या, त्यामुळे टॉस जिंकून कॅप्टन पहिले बॅटिंगचा निर्णय घेऊ शकतो.

कोलंबोच्या खेळपट्टीवर टीम इंडियाने 17 वेळा पहिले बॅटिंग केली आहे, यातल्या 5 वेळा त्यांना 300 रन पेक्षा जास्त करता आले होते, या पाचही मॅच भारताने जिंकल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा टॉस जिंकून बॅटिंग घेत श्रीलंकेच्या बॉलिंगपुढे टीम इंडिया अडचण निर्माण करू शकते. आयपीएलमध्ये शिखर धवन आणि पृथ्वी शॉ दिल्लीला चांगली सुरुवात करून देतात, अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

प्रेमदासा स्टेडियममध्ये टीम इंडियाने 17 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग केली, यातल्या 10 सामन्यात भारताचा विजय झाला, तर 6 मॅचमध्ये त्यांना पराभव स्विकारावा लागला. एक मॅच पावसामुळे रद्द झाली. टीम इंडियाने जुलै 2004 पासून श्रीलंकेविरुद्ध 8 वनडेमध्ये पहिले बॅटिंग केली. यातल्या सगळ्या सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला. म्हणजेच 17 वर्षांमध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिले बॅटिंग करून एकही मॅच गमावली नाही. या मैदानात भारत-श्रीलंका यांच्यात एकूण 33 मॅच झाल्या आहेत, यात दोन्ही टीमनी 15-15 मॅच जिंकल्या तर 3 सामने रद्द झाले.

First published:
top videos

    Tags: Cricket, India Vs Sri lanka