मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात हा असावा टीमचा कर्णधार, दीपक चहरची इच्छा

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात हा असावा टीमचा कर्णधार, दीपक चहरची इच्छा

टीम इंडिया (Team India) इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) असतानाच दुसरीकडे भारतीय टीम जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) जाणार आहे. या टीममध्ये युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे, ज्यांची इंग्लंड दौऱ्यावर निवड झाली नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 मे : टीम इंडिया (Team India) इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) असतानाच दुसरीकडे भारतीय टीम जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) जाणार आहे. या टीममध्ये युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे, ज्यांची इंग्लंड दौऱ्यावर निवड झाली नाही. श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी कर्णधार म्हणून शिखर धवन (Shikhar Dhawan), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्या नावांची चर्चा आहे, पण टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) याला मात्र शिखर धवनला टीमचं नेतृत्व मिळावं, असं वाटत आहे.

दीपक चहरने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही इच्छा बोलून दाखवली. 'शिखर धवन बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे, त्याच्याकडे अनुभवही आहे, त्यामुळे कर्णधार म्हणून तो चांगला पर्याय आहे. सगळे खेळाडू धवनची इज्जत करतात आणि त्याचं ऐकतातही,' असं दीपक चहर म्हणाला.

दीपक चहरला श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. 'मला माझ्यावर विश्वास आहे, मी श्रीलंका दौऱ्यासाठी तयार आहे. आयपीएलमध्येही मी चांगली बॉलिंग केली आहे आणि मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेत खेळण्यासाठी मी उत्साही आहे. आमची ही टीम सिनियर टीमप्रमाणेच मजबूत दिसत आहे. आमच्याकडे खूप पर्याय आहेत,' असं वक्तव्य दीपक चहरने केलं.

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी राहुल द्रविड (Rahul Dravid) पार पाडेल. राहुल द्रविड सध्या एनसीएचा प्रमुख आहे. रवी शास्त्रीच्या गैरहजेरीत द्रविडकडे प्रशिक्षकपद देण्यात आलं आहे. द्रविडकडेही प्रशिक्षकपदाचा चांगला अनुभव आहे, त्याने आधी इंडिया-ए आणि भारताच्या अंडर-19 टीमचा प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे.

First published:

Tags: Cricket, India Vs Sri lanka, Shikhar dhawan, Team india