मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asia cup 2022: टीम इंडियाला मोठा धक्का, जडेजानंतर आणखी एक स्टार खेळाडू बाहेर

Asia cup 2022: टीम इंडियाला मोठा धक्का, जडेजानंतर आणखी एक स्टार खेळाडू बाहेर

रविंद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर तर टीम इंडियातील आणखी एक स्टार खेळाडू बाहेर, रोहितचं टेन्शन वाढलं, कोणाला मिळणार संधी?

रविंद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर तर टीम इंडियातील आणखी एक स्टार खेळाडू बाहेर, रोहितचं टेन्शन वाढलं, कोणाला मिळणार संधी?

रविंद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर तर टीम इंडियातील आणखी एक स्टार खेळाडू बाहेर, रोहितचं टेन्शन वाढलं, कोणाला मिळणार संधी?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 7 सप्टेंबर : आशिया कपममध्ये दोन सामने जिंकले तर दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. सलग दुसऱ्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रविंद्र जडेजापाठोपाठ आणखी एक स्टार खेळाडू टीम इंडियातून बाहेर गेला आहे. दुखापतीमुळे हा खेळाडू बाहेर गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रोहित शर्माचं टेन्शन वाढलं असून आशिया कप कसा मिळणार याची चिंता आहे.

भारताचा फास्ट बॉलर आवेश खान आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बॅकअप म्हणून असलेला दीपक चाहरला संघात खेळावणार असल्याची माहिती मिळाली आहे. तो खेळाडू म्हणून संघासोबत होता. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यापूर्वी आवेश आजारी पडला होता. त्याला ताप आला होता. त्यामुळेच तो या सामन्यात खेळला नाही. आवेशच्या आधी रवींद्र जडेजाही गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून आऊट झाला होता. जडेजा पाठोपाठ आता आवेश खान देखील आशिया कपमधून बाहेर पडला आहे.

हेही वाचा- Asia Cup 2022: वर्ल्ड कप जिंकायला निघाले पण आशिया कपमध्येच हरले, रोहित शर्माला या चुका पडल्या महागात

BCCI च्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आवेशला ताप आहे. तो या स्पर्धेत पुढे खेळू शकणार नाही. दीपक चाहरला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. फिटनेसच्या कारणांमुळे दीपकची आशिया कपच्या मुख्य संघात निवड झाली नव्हती. त्याला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजआधी आवेश खान फिट होऊन संघात परतेल अशी आशा आहे. मात्र त्याने टी २० वर्ल्ड कपआधी फिट होणं टीमसाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. रविंद्र जडेजा टी २० वर्ल्ड कपमधूनही बाहेर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता रोहित शर्मा आणि मॅनेजमेंट समोर टेन्शन आहे.

हेही वाचा- Asia Cup 2022: श्रीलंकेची विजयी हॅटट्रिक, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीम इंडियाचं काय होणार?

आशिया कपमध्ये आवेश खानला चांगली कामगिरी करता आली नाही.. त्याने 2 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. दोन्ही सामन्यात तो टीम इंडियासाठी महागात पडला. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 2 ओव्हरमध्ये 19 धावा देऊन फक्त एक विकेट मिळाली. हाँगकाँगविरुद्ध, त्याने 4 ओव्हरमध्ये 53 धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली.

First published:

Tags: Asia cup, India vs Pakistan, Rohit sharma, Team india