S M L

लंकेची 'हंडी' फोडत भारताने कसोटी मालिका जिंकली, 85 वर्षांनंतर रचला इतिहास

. या विजयासह भारताने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली आहे.

Sachin Salve | Updated On: Aug 14, 2017 03:54 PM IST

लंकेची 'हंडी' फोडत भारताने कसोटी मालिका जिंकली, 85 वर्षांनंतर रचला इतिहास

14 आॅगस्ट : भारतीय टीमने शेवटच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत सामना एक इनिंग आणि 171 रन्सने खिश्यात घातलीये. या विजयासह भारताने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली आहे.

भारताने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत सलग दोन वेळा विजय मिळवलाय. दोन्ही सामने एका इनिंगच्या अंतराने विजय मिळवला. दुसरी कसोटीही भारताने एका इनिंगच्या अंतराने जिंकली होती. 85 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात भारताने पहिल्यांना सलग तिन्ही सामने जिंकले आहे.

अखेरच्या टेस्टमध्ये श्रीलंकेचा डावानं पराभव करत विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियानं ऐतिहासिक विजय नोंदवलाय. टीम इंडियानं श्रीलंकेला त्यांच्याच घरी व्हाईट-वॉश दिलाय. अखेरच्या टेस्ट तर टीम इंडियाने तिसऱ्या दिवशीच गुंडाळली. डाव आणि 171 रन्सनी श्रीलंकेचा पराभव केला. या विजयाचा शिल्पकार होता शिखर धवन,हार्दिक पंड्या आणि रविचंद्रन अश्विन..या दौऱ्यात शिखर धवन हा सर्वोत्तम बॅट्समन ठरला. तीन मॅचमध्ये  358 रन्स केले. यामध्ये 2 सेंच्युरीचा समावेश आहे. त्या पाठोपाठ चेतेश्वर पुजारानं 309 रन्स केले. तर रवीचंद्रन अश्विननं 17 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जाडेजानं 2 मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या.

रवी शास्रींच्या सेकंड इनिंगची विजयी सुरुवात झालीये. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियानं 8 वी कसोटी मालिक जिंकलीये. या मानहानिकारक पराभवानंतर श्रीलंका वन-डे आणि टी-20मध्ये टीम इंडियापुढे फारस आव्हान उभं करण्याची शक्यता धुसरच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 03:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close