मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL: नववर्षात विराटसेनेचा विजयी शुभारंभ! टीम इंडियाने 79 धावांनी मिळवला मालिका विजय

IND vs SL: नववर्षात विराटसेनेचा विजयी शुभारंभ! टीम इंडियाने 79 धावांनी मिळवला मालिका विजय

भारतानं दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 123 धावांवर गारद झाला.

भारतानं दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 123 धावांवर गारद झाला.

भारतानं दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 123 धावांवर गारद झाला.

  • Published by:  Priyanka Gawde
पुणे, 10 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना भारतानं धावांनी जिंकला. यासह भारतानं नववर्षातील पहिला मालिका विजय मिळवला. या सामन्यात भारतानं दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 123 धावांवर गारद झाला. शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना जास्त काळ मैदानावर टिकू दिले नाही. भारताकडून नवदीप सैनीनं3 तर शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2-2 तर जसप्रीत बुमराहनं 1 विकेट घेतली. तत्पूर्वी श्रीलंकेने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यात सलामीचे फलंदाज केएल राहुल-शिखर धवन यांनी 97 धावांची भागीदारी केली. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. शार्दुल ठाकूरच्या 8 चेंडूत 22 धावा आणि मनिष पांडेच्या 32 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं श्रीलंकेला 202 धावांचे आव्हान दिले. दुखापतीनंतर श्रीलंकेविरुद्ध कमबॅक करणाऱ्या शिखर धवननं या सामन्याच अर्धशतकी खेळी केली. शिखरनं 36 चेंडूत 52 धावा केल्या. मात्र धवन बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली नाही तर संजू सॅमसनला संधी देण्यात आली. संजूला 5 वर्षांनंतर संघात जागा मिळाली मात्र त्याला या संधीचे सोने करता आले नाही. संजूनं पहिल्याच चेंडूत षटकार लगावला. मात्र त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये संजू 6 धावांवर बाद झाला. संजू बाद झाल्यानंतर विराटनं मनीष पांडेला फलंदाजीसाठी पाठवले. त्यानंतर केएल राहुल 54 धावांवर बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतर विराट फलंदाजीसाठी येईल अशी अपेक्षा असताना श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला. अय्यरला केवळ 4 धावा करता आल्या. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर विराट फलंदाजीसाठी आला. विराटनं 17 चेंडूत 26 धावांची खेळी मात्र त्याला 20 ओव्हर टिकता आले नाही. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर शुन्यावर बाद झाला. श्रीलंकेकडून लक्षण संडकननं 3 विकेट घेतल्या. तर, लाहिरू कुमारा आणि वानिंडू हसरंगा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. विराट कोहलीनं पूर्ण केल्या 11 हजार धावा विराट कोहलीनं श्रीलंकेविरुद्ध 1 धावा काढत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा जगातील सहावा आणि दुसरा भारतीय कर्णधार आहे. टीम इंडियाचे नेतृत्व करतानाही विराटनं तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 83 एकदिवसीय सामन्यात विराटनं 77.60च्या सरासरीनं 4 हजार 889 धावा केल्या आहेत. तर, 53 कसोटी सामन्यात 63.80च्या सरासरीनं 5 हजार 104 आणि 32 टी-20 सामन्यात 1006 धावा केल्या आहेत. बुमराहने टाकले अश्विनला मागे दरम्यान या सामन्यात जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहनं 1 विकेट घेत टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी बुमराहच्या नावावर रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांच्यासह 52 विकेट घेत संयुक्त रुपात पहिल्या स्थानावर होता. बुमराहनं 45 सामन्यात 53 विकेट घेतल्या आहेत. तर, चहलनं 36 आणि अश्विननं 46 सामन्यात ही कामगिरी केली आहे. भारताचा संघ- केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, विराट कोहली, मनीष पांडे, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल श्रीलंका : लसिथ मलिंगा, दनुष्का गुणतिलका, अविष्का फर्नाडो, अँजेलो मॅथ्यूज, दसून शनाका, कुशल परेरा, निरोशान डिक्वेला, धनंजय डीसिल्व्हा, इसुरू उदाना, भानुका राजपक्षा, ओशाडा फर्नाडो, वानिंडू हसरंगा, लाहिरू कुमारा, कुशल मेंडिस, लक्षण संडकन, कुशल रजिता.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या