IND vs SL: यॉर्कर किंग बुमराह पुण्यात घालणार राडा! मोडणार सर्वात मोठा रेकॉर्ड

IND vs SL: यॉर्कर किंग बुमराह पुण्यात घालणार राडा! मोडणार सर्वात मोठा रेकॉर्ड

भारत-श्रीलंका यांच्यात आज पुण्यात तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 1-0नं आघाडी घेतली आहे.

  • Share this:

पुणे, 10 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यात आज पुण्यात तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 1-0नं आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज होण्याची संधी आहे. फक्त 1 विकेट घेत बुमराह हा रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे.

बुमराहच्या नावावर सध्या रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांच्यासह 52 विकेट घेत संयुक्त रुपात पहिल्या स्थानावर आहे. बुमराहनं 44 सामन्यात 52 विकेट घेतल्या आहेत. तर, चहलनं 36 आणि अश्विननं 46 सामन्यात ही कामगिरी केली आहे.

वाचा-फक्त 1 धाव आणि कोहली टाकणार सर्व दिग्गज क्रिकेटपटूंना मागे

टीम इंडिया: T-20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

जसप्रीत बुमराह: 44 मॅच, 52 विकेट

युजवेंद्र चहल: 36 मॅच, 52 विकेट

रविचंद्रन अश्विन: 46 मॅच, 52 विकेट

भुवनेश्वर कुमार: 43 मॅच, 41 विकेट

कुलदीप यादव: 21 मॅच, 39 विकेट

वाचा-‘वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच घेणार निवृत्ती’, रोहित शर्माचा गौप्यस्फोट!

बुमराहचा शानदार कमबॅक

26 वर्षांचा बुमराह दिर्घकाळाच्या विश्रांतीनंतर संघात पुनरागमन करत आहे. इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 समन्यात बुमराहनं दुखापतीनंतर आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 32 धावा दिल्या.

वाचा-बाउंड्री बाहेर घेतला कॅच, तरी फलंदाज झाला बाद! पाहा क्रिकेटमधला वादग्रस्त VIDEO

भारताकडे विजयी आघाडी

भारत-श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आज पुण्यात होणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशिनवर (Maharashtra Cricket Association Stadium) खेळला जाणार आहे. दरम्यान या मालिकेत गुवाहटीमध्ये पहिला सामना रद्द झाला होता. तर, इंदोरमध्ये भारतानं विजय मिळवत 1-0नं आघाडी घेतली होती. त्यामुळं ही मालिका आपल्या नावावर करण्यासाठी टीम इंडियाला पुण्यात आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2020 02:47 PM IST

ताज्या बातम्या