Home /News /sport /

IND vs SL : ...आणि कॅप्टन कोहलीनं मैदानात केली भज्जी स्टाईल गोलंदाजी, VIDEO VIRAL

IND vs SL : ...आणि कॅप्टन कोहलीनं मैदानात केली भज्जी स्टाईल गोलंदाजी, VIDEO VIRAL

हरभजन सिंग मैदानात उभा असतानाच विराटनं केली त्याची नक्कल.

    इंदूर, 07 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यात इंदूरमध्ये दुसरा टी-20 सामना होत आहे. या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात युवा गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना 142 धावांतच रोखले. त्यामुळं भारताला विजयासाठी 143 धावांचे आव्हान आहे. मात्र या सामन्याआधी कर्णधार विराट कोहली एका वेगळ्याच मुडमध्ये दिसून आला. विराटनं सामन्याआधी हरभजन सिंग स्टाईल गोलंदाजी केली. भारत-श्रीलंका सामन्याआधी सराव करत असताना विराट कोहलीनं भारताचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगची नक्कल केली. सामन्याआधी भारतीय संघाचा सराव सुरू असताना एक अनोखे आणि मनोरंजक दृश्य पाहायला मिळाला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने हातात चेंडू घेऊन गोलंदाजीची तयारी करत होता. त्यानंतर विराटनं चक्क हरभजन सिंगच्या गोलंदाजीची नक्कल केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजे विराट नक्कल करत असताना हरभजन सिंग मैदानावरच उपस्थित होता. वाचा-अजिंक्यची चिमुकली बाबांच्या Hero ला भेटली तेव्हा... वाचा-विराटच्या सगळ्यात मोठ्या शत्रुचा कमबॅक, खतरनाक बॉलिंगने केले बॅटचे दोन तुकडे भज्जी-कोहलीने केली एकत्र गोलंदाजी विराट कोहलीने हरभजन सिंगच्या गोलंदाजीची नक्कल करताच तिथे उभे असलेल्या भज्जीने गोलंदाजीची झलक दाखविली. हे पाहून विराटनेही त्याच्या डोक्यावर हात ठेवला. या वेळी भज्जीच्या चेहऱ्याच्या हावभावावरून विराट कोहलीच्या कॉपीमुळे तो खूश नसल्याचे दिसत होते. मात्र नंतर हरभजन सिंग आणि विराट कोहली दोघेही त्यांच्या जुगलबंदीवर हसले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या