Home /News /sport /

IND vs SL : नववर्षात विराटसेनेची आतषबाजी, भारतानं 7 विकेटनं जिंकला सामना

IND vs SL : नववर्षात विराटसेनेची आतषबाजी, भारतानं 7 विकेटनं जिंकला सामना

भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या 6 द्विपक्षीय टी20 मालिकेत श्रीलंकेला एकदाही भारताला नमवता आलेले नाही.

    इंदूर, 07 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यात झालेला दुसरा टी-20 सामना भारतानं 7 विकेटनं जिंकला. त्यामुळं तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0नं आघाडी घेतली आहे. दरम्यान पहिला सामना पावसामुळं रद्द झाला होता, दुसऱ्या सामन्यात भारतानं ती कसर भरून काढली. श्रीलंकेने दिलेले 142 धावांचे आव्हान भारतानं ओव्हरमध्ये पार केले. यात श्रेयस अय्यरनं 34 धावांची तुफानी खेळी केली. या सामन्यात सलामीला आलेल्या लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर केएल राहुल 45 धावांवर तर धवन 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी आतषबाजी करत सामन्यात विजय मिळवला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं 17 चेंडूत 30 धावा करत सामन्यात विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या युवा गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, कुलदीप यादव यांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी मजल मारता आली नाही. नवदीप सैनीनं 5व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अविष्का फर्नांडोला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं 8व्या ओव्हरमध्ये धानुष्काला माघारी धाडले. 19व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरनं तीन विकेट घेत श्रीलंकेला धावांवर रोखले. शार्दुलनं मलिंगाला शुन्यावर बाद केले. श्रीलंकेकडून कुशल परेरानं सर्वात जास्त म्हणजे 34 धावा केल्या. त्याशिवाय इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. तर, तीन महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं दासून शंकरला 7 धावांवर बाद करत या सामन्यात विकेट मिळवली. त्यामुळं चाहत्यांनी मैदानावर एकच जल्लोष केला. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर यांनी 1 तर नवदीप सैनी, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. विराटनं टाकले रोहितला मागे आंतरराष्ट्रीय टी -20मध्ये सध्या विराट आणि रोहित सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. याक्षणी विराट आणि रोहित टी -20मध्ये बरोबरीत आहेत. या सामन्याआधी दोघांनी 2633 धावा केल्या होत्या. त्यामुळे या मालिकेत विराटनं पहिली धाव काढत रोहितला मागे टाकले. रोहितला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. तर, याआधी विराटनं बांगलादेशविरुद्ध विश्रांती घेतली होती. या मालिकेत रोहित विराटच्या पुढे गेला होता. भारत-श्रीलंका यांच्यातील टक्कर भारत-श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 2009पासून एकूण 16 टी-20 सामने झाले आहेत. यातील 11 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर 5 सामन्यात श्रीलंकेनं बाजी मारली आहे. मुख्य म्हणजे भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या 6 द्विपक्षीय टी20 मालिकेत श्रीलंकेला एकदाही भारताला नमवता आलेले नाही. भारताचा संघ- शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी. श्रीलंका : लसिथ मलिंगा, दनुष्का गुणतिलका, अविष्का फर्नाडो, अँजेलो मॅथ्यूज, दसून शनाका, कुशल परेरा, निरोशान डिक्वेला, धनंजय डीसिल्व्हा, इसुरू उदाना, भानुका राजपक्षा, ओशाडा फर्नाडो, वानिंडू हसरंगा, लाहिरू कुमारा, कुशल मेंडिस, लक्षण संडकन, कुशल रजिता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या