Ind vs SL: आज दिग्गज खेळाडूचा करणार कमबॅक, अशी असेल भारताची प्लेयिंग इलेव्हन

Ind vs SL: आज  दिग्गज खेळाडूचा करणार कमबॅक, अशी असेल भारताची प्लेयिंग इलेव्हन

भारत-श्रीलंका यांच्यातील पहिला सामना रद्द झाल्यानंतर आज इंदूरमध्ये होळकर मैदानावर दुसरा टी-20 सामना होणार आहे.

  • Share this:

इंदूर, 07 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यातील पहिला सामना रद्द झाल्यानंतर आज इंदूरमध्ये होळकर मैदानावर दुसरा टी-20 सामना होणार आहे. दरम्यान या मालिकेत रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर, गेल्या तीन-चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेला जसप्रीत बुमराह आज कमबॅक करेल. त्यामुळं सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे असणार आहे.

टीम इंडियामध्ये तीन बदल निश्चित आहेत

या मालिकेसाठी सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळं दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला शिखर धवन कमबॅक करू शकतो. तर, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर वेगवान गोलंदाजीत जखमी झाले आहेत. त्यामुळं गोलंदाजीमध्ये नवदीप सैनीला जागा मिळू शकते.

वाचा-गुवाहटीत पावसाच्या खेळानंतर इंदौरमध्ये काय होणार? हवामान विभागाने दिली ही माहिती

वाचा-अखेर संजू सॅमसनला मिळणार संधी? पंत नाही तर 'या' खेळाडूला विराट बसवणार बाहेर

अशी असेल प्लेयिंग इलेव्हन

आजच्या सामन्यात भारतीय संघात सलामीला मोठा दिसेल. दुखापतग्रस्त शिखर धवन रोहित शर्माच्या जागी केएल राहुलच्यासोबत ओपनिंग करेल. तर, वेगवान गोलंदाजीत अनुभवी स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांनी कमबॅक करत आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला बुमराह हा टीम इंडियाच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग आहे. दीपक चाहरच्या जागी तरुण नवदीप सैनीला संधी मिळाली आहे. हा एक बदल आहे जो भविष्यातील गोलंदाज मानला जात आहे.

वाचा-हेअर ड्रायर आणि इस्त्री वापरणाऱ्यांवर भडकला गांगुली, BCCI करणार कारवाई

मोडला जाऊ शकतो अश्विनचा विक्रम

भारताकडून टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अद्याप फिरकीपटू आर अश्विनच्या नावावर आहे. अश्विनच्या नावावर 52 टी -20 विकेट घेण्याचा विक्रम आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने त्याची बरोबरी केली आहे पण त्याला मागे टाकता आले नाही. चहलने अवघ्या 36 टी -20 सामन्यांत 52 विकेट घेतल्या आहेत. अश्विननं हा विक्रम 46 सामन्यात केला आहे.

वाचा-गोलंदाजाची बॉलिंग पाहून घाबरला फलंदाज अन् टाकली विकेट, VIDEO VIRAL

विराट टाकणार रोहितला मागे

आंतरराष्ट्रीय टी -20मध्ये सध्या विराट आणि रोहित सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. याक्षणी विराट आणि रोहित टी -20मध्ये बरोबरीत आहेत. विराटने 75 सामन्यांत 2633 धावा केल्या आहेत तर रोहितने 104 सामन्यात 2633 धावा केल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत विराट रोहितला एक धाव काढताच मागे टाकणार आहे.

भारताचा संभाव्य संघ-शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 7, 2020 02:52 PM IST

ताज्या बातम्या