News18 Lokmat

लंकेचा वाजला डंका, 304 रन्सने भारताचा रेकाॅर्डब्रेक विजय

लंकेची टीम 245 रन्सवर गारद झाली. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2017 05:20 PM IST

लंकेचा वाजला डंका, 304 रन्सने भारताचा रेकाॅर्डब्रेक विजय

29 जुलै : श्रीलंकेच्या मायभूमीतच लंकेचा डंका वाजवत भारताने पहिल्या कसोटीत 304 रन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 550 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करणारी लंकेची टीम 245 रन्सवर गारद झाली. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीये.

गाॅल स्टेडियम खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारताने आपली इनिंग 240 रन्सवर घोषित केली. पहली इनिंगमध्ये 309 रन्सची आघाडी मिळून भारताने लंकेसमोर 550 रन्सचा डोंगर उभा केला. 550 रन्सचा पाठलाग करणारी लंकेची टीम 76.5 ओव्हरमध्ये 245 रन्सवर आॅलआऊट झाली.

भारताने तिसऱ्या दिवशी तीन गडी बाद 189 रन्स केले होते. विराट कोहलीने नाबाद 76 रन्सची खेळी केली. तर अभिनव मुकुंदने 81 रन्स केले. चौथ्या दिवशी कोहलीने दमदार सुरुवात करत शानदार शतक झळकावलं. कोहली आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी 51 रन्स केले.

श्रीलंकेकडून परेराय कुमार आणि गुनाथिलाका याने एक-एक विकेट घेतल्या. लंकेच्या टीमने पहिला इनिंगमध्ये 291 रन्स केले होते. तर भारताने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये 600 रन्स केले होते. भारताने एवढा मोठा स्कोअर उभा करून सुद्धा श्रीलंकेला फाॅलोआन देऊ शकलो नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...