Home /News /sport /

IND vs SL: श्रीलंकेच्या कॅप्टननं 'या' गोष्टीवर फोडलं पराभवाचं खापर

IND vs SL: श्रीलंकेच्या कॅप्टननं 'या' गोष्टीवर फोडलं पराभवाचं खापर

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या टी20 मॅचमध्ये यजमानांचा मोठा पराभव झाला. टीम इंडियानं ही मॅच 38 रननं जिंकली. या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

    कोलंबो, 26 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या टी20 मॅचमध्ये यजमानांचा मोठा पराभव झाला. टीम इंडियानं ही मॅच 38 रननं जिंकली. या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन देशांमधील वन-डे मालिका टीम इंडियानं यापूर्वीच जिंकली आहे. श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाकानं (Dasun Shanaka) या पराभवानंतर कारण सांगितलं आहे, 'या पिचवर 164 रनचा पाठलाग करणे शक्य होते. भारतीय बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. त्यांनी आम्हाला कमी धावसंख्येत रोखले. आमच्याकडं खेळ यशस्वी संपवतील असे मिडल ऑर्डरमधील बॅट्समन नव्हते. असलंकाची विकेट ही टर्निंग पॉईंट ठरली' असा कारण शनाकानं दिलं आहे. पुढील मॅचमध्ये चांगली कामगिरी करण्याचा विश्वास देखील त्यानं व्यक्त केला आहे. भारताने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 126 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे त्यांचा 38 रनने पराभव झाला. वनडे सीरिजमध्ये संघर्ष करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) टी-20 सीरिजमध्ये सूर गवसला. भुवीने 3.3 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर दीपक चहरने 2 विकेट मिळवल्या. कृणाल पांड्या, वरुण चक्रवर्ती, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. श्रीलंकेकडून चरीथ असलंकाने सर्वाधिक 44 रन केले. 'या' क्रिकेटपटूनं रचला इतिहास, हिजाब घालून खेळणारी बनली पहिली खेळाडू श्रीलंकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर पहिल्याच बॉलला भारताला धक्का बसला. ओपनर पृथ्वी शॉ शून्य रनवर माघारी परतला. कर्णधार शिखर धवन आणि संजू सॅमसन यांनी भारताचा डाव सावरला, पण संजू सॅमसन 27 रनची चांगली सुरुवात मिळाल्यानंतर आऊट झाला, तर शिखर धवन 46 रन करून माघारी परतला. हार्दिक पांड्याला 12 बॉलमध्ये 10 रन करता आले. इशान किशन 14 बॉलमध्ये 20 रनवर आणि कृणाल पांड्या 3 रनवर नाबाद राहिले. श्रीलंकेकडून दुष्मंता चमिरा आणि वानिंदू हसरंगा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर चामिका करुणारत्नेला एक विकेट घेण्यात यश आलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka

    पुढील बातम्या