India vs South Africa : ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला लागली फक्त 9 मिनिटं आणि 12 चेंडू!

India vs South Africa : ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला लागली फक्त 9 मिनिटं आणि 12 चेंडू!

आफ्रिकेला व्हाइट वॉश देत विराटसेननं केली विक्रमी कामगिरी.

  • Share this:

रांची, 22 ऑक्टोबर : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना एक डाव आणि 202 धावांनी जिंकला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फंलदाजांची दाणादाण उडाली. तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेचे 8 ग़डी बाद झाले होते. त्यानंतर चौथ्या दिवशी भारताने फक्त 12 चेंडूत उरलेले दोन गडी बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारतानं याआधीचे दोन्ही कसोटी सामने जिंकले होते. तिसरा सामना जिंकून आफ्रिकेला व्हाइट वॉश दिला.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं या ऐतिहासिक विजयासह अनेक किर्तीमान आपल्या नावावर केले आहे. याशियाव विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार झाला आहे.

वाचा-VIDEO : मैदानावर सहकारी बनला शत्रू, आफ्रिकेच्या डावाचा असा झाला शेवट

दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ

कर्णधार विराट कोहली पहिला कर्णधार ठरला आहे, ज्यानं दक्षिण आफ्रिका संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. याआधी कोणत्याच कर्णधाराला असा पराक्रम करता आला नाही आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका विरोधात एकपेक्षा जास्त मालिका जिंकण्याची कामगिरी करणारा विराट पहिला कर्णधार ठरला आहे. याधी सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरनं 1-1 मालिका जिंकल्या आहेत.

वाचा-VIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर

सगळ्यात जास्त धावांनी जिंकला सामना

याआधी सर्वात जास्त धावा आणि डावांनी सामना जिंकण्याची कामगिरी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. या विक्रमाची आता विराटनं बरोबरी केली आहे. विराटनं तब्बल नव्यांदा एका डावानं विजय मिळवला. याआधी मोहम्मद अझरुद्दीननं 8व्यांदा तर गांगुलीनं 7व्यांदा ही कामगिरी केली होती.

दक्षिण आफ्रिका विरोधात सर्वात जास्त कसोटी विजय

भारतीय संघाकडून सर्वा जास्त कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली पहिली खेळाडू ठरला आहे. तर, जगातला दुसरा कर्णधार आहे, ज्यानं दक्षिण आफ्रिकेला 7 सामन्यात पराभूत केले आहे. विराटच्या आधी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग याचा क्रमांक लागतो. पॉटिंगनं कर्णधार म्हणून 8वेळा सामना जिंकण्याची कामगिरी केली आहे.

वाचा-जडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO

7 द्विशतकांचा विक्रम

विराट कोहली सात द्विशतक लगावणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. याशिवाय भारताकडून सर्वात जास्त दुहेरी शतक लगावणारा एकमेव खेळाडू आहे. विराटनं दुसऱ्या कसोटी सामन्यात 254 धावांची खेळी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 02:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading