India vs South Africa : मालिका विजयानंतरही विराटनं आफ्रिकेला दिलं ओपन चॅलेंज, म्हणाला...

India vs South Africa : मालिका विजयानंतरही विराटनं आफ्रिकेला दिलं ओपन चॅलेंज, म्हणाला...

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा सामना रांची येथे 19 ऑक्टोबरला होणार आहे.

  • Share this:

पुणे, 13 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला नमवतं, मालिका विजय मिळवला. भारतानं मायदेशात मिळवलेला हा 11वा मालिका विजय आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी नमवलं. दरम्यान तिसरा सामना रांची येथे 19 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात आफ्रिकेला नमवत भारतीय संघ क्लिन स्विप देण्याच्या तयारीत आहे.

दुसऱ्या सामन्यात 137 धावांनी विजय मिळवल्यानंतर भारतानं घरच्या मैदानावर 11वा मालिका विजय आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं 2-0नं मालिका खिशात घातली आहे. दरम्यान या सामन्यात पहिल्या डावात द्विशतकी कामगिरी करणाऱ्या विराटला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान यावेळी विराटनं, “आमचे लक्ष टेस्ट चॅम्पियनशीपवर आहे. स्वदेशात असो किंवा विदेशात प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळं तिसऱ्या सामन्यातही आम्ही विजयासाठी खेळणार. मालिका जिंकली म्हणून सगळं झालं नाही”, असे ठणकावले.

वाचा-कॅप्टन कोहलीचा स्पेशल रेकॉर्ड, 50वा कसोटी सामना ठरला खास

‘आता आफ्रिकेला देणार क्लिन स्विप’

यावेळी विराटन, “कोणताही खेळाडू सामन्यावरची पकड सोडणार नाही. तिसऱ्या कसोटी सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरू आणि 3-0नं मालिका विजय मिळवू”, असे सांगितले. उप-कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत विराटनं केलेल्या 178 धावांच्या भागिदारीबाबत विराटनं, “मला रहाणेसोबत फलंदाजी करायला आवडते. आम्ही जेव्हा एकत्र खेळतो, तेव्हा धावसंख्या पुढे घेऊन जातो. पहिल्या डावात नव्या चेंडूचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज होतो”, असे सांगितले.

वाचा-शमीची 'बोल्ड' कामगिरी, कसोटी क्रिकेटमध्ये घडवला इतिहास

साहा आणि अश्विनचे केले विशेष कौतुक

दरम्यान या सामन्यात सर्वात जास्त झेल घेणाऱ्या विकेटकीपर ऋध्दीमान साहाबाबत, “विशाखापट्टणममध्ये साहा थोडा घाबरला होता. मात्र त्यानं शानदार विकेटकिपींग केली. अश्विननेही चांगली कामगिरी केली. सुरुवातीला कसोटी रॅकिंगमध्ये आम्ही सातव्या क्रमांकावर होतो. पुढे जाण्यासाठी आमच्याकडे फक्त एकच रस्ता होता, तो म्हणजे मेहनत. गेल्या तीन-चार वर्षात संघाला खुप चांगले खेळाडू लाभले आहेत”, असे विराटनं सांगितले.

वाचा-कसोटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ‘बिग बॉस’, इतर संघांची अवस्था दयनीय!

‘भारतानं चांगली गोलंदाजी केली’

कसोटी सामन्यात टीम इंडिया फक्त दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरली. याबाबत बोलताना विराटनं, “भारताच्य खेळपट्टीवरचा हा निर्णय योग्य होता. आफ्रिकेच्या फिलेंडर आणि रबाडा या दोन्ही गोलंदाजांनी आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आम्हालाही असाच एक गोलंदाज हवा होता. पण भारताच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळं मी खुश आहे”, असे सांगितले.

वाचा-टीम इंडिया कसोटीचा बादशाह, आफ्रिकेविरुद्धच्या विजयानं ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड!

VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या