Elec-widget

कॅप्टन कोहली मैदानावरचा राडा पडला महागात, ICCने केली मोठी कारवाई

कॅप्टन कोहली मैदानावरचा राडा पडला महागात, ICCने केली मोठी कारवाई

विराट कोहलीला पुन्हा पडला राग महागात. आयसीसीच्या नियमांचे झाले उल्लंघन.

  • Share this:

बंगळुरू, 23 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. मात्र, या सामन्यात विराट कोहलीकडून एक मोठी चुक झाली, त्याचा फटका त्याला बसला. आयसीसीनं विराट कोहलीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहलीनं आसीसीच्या एका नियमांचे उल्लंघन केले आहे. विराट कोहलीनं आयसीसीच्या लेव्हल-1 नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळं आयसीसीच्या वतीनं विराटवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळं आता विराटच्या गुणतालिकेत एक डेमेरिट पॉइंटची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर विराटला चेतावणीही दिली आहे. विराटनं आयसीसीच्या आचारसंहिता कलम 2.12 मधली नियमांचे उल्लंघन केले आहे. यात एखादा खेळाडू सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडू, पंच, रेफ्री किंवा कोणत्याही व्यक्तीशी अनुसुचित प्रकारे शारिरीक संपर्क करू शकत नाही.

हाच नियम विराटनं तोडल्यामुळं त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळं विराटच्या नावावर आणखी एका डेमेरिट गुणाची नोंद झाली आहे. सप्टेंबर 2016नंतर विराट कोहलीनं असे तिसऱ्यांदा केले आहे. त्यामुळं विराटच्या नावावर आता तीन डेमेरिट गुणाची नोंद झाली आहे.याआधी कोहलीनं दक्षिण आफ्रिका विरोधात 15 जानेवारी 2018मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यानंतर 2019मध्ये अफगाणिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात डेमेरिट गुणाची नोंद झाली.

वाचा-सर्बियन मॉडेलच्या प्रेमात पडला टीम इंडियाचा स्टार खेळाडू, सोशल मीडियावर कबुली

मैदानावर हा राडा घडला तेव्हा भारतीय संघ पाचव्या ओव्हरमध्ये खेळत होता. भारतानं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय विराटला काही फळास आला नाही. सलामीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान विराट कोहली फलंदाजीसाठी आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ब्युरन हॅंड्रिक्सच्या गोलंदाजीवर धावा काढताना विराटचा धक्का हॅंड्रिक्सला बसला. दरम्यान विराटनं हा आरोप मान्य करत, आयसीसीनं केलेल्या कारवाईचा स्विकार केला आहे. याबाबत आयसीसीचे पॅनल प्रमुख रिची रिचर्ड्स यांनी, याबाबत कोणतीही चर्चा होणार नाही, असे सांगितले.

Loading...

वाचा-पंतने विराटला तोंड लपवायला जागा ठेवली नाही, शेवटी टोपीचा आधार!

मैदानावरील पंच नितिन मेनन आणि सीके नंदन, तिसरे पंच अनिल चौधरी आणि चौथे रेफ्री शमशुद्दीननं विराटवर हे आरोप केले. दरम्यान या नियमांचे उल्लंखन करणाऱ्या खेळाडूवर चेतावणी, 50 टक्के मॅच फी किंवा डेमेरिट पॉइंट्स अशी शिक्षा दिली जाते.

दरम्यान अखेरच्या टी-20 सामन्यात भारताची आघाडीची फळी पुर्णपणे ढेपाळली. रोहित शर्मा, विराट कोहली लवकर बाद झाले. धवनने 36 धावांची खेली केली मात्र मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. हार्दिक पांड्या 18 चेंडूत 14 धावाच करू शकला. मधल्या फळीत पुन्हा निराशाच हाती आली. पंत आणि जडेजाने प्रत्येकी 19 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 5 आणि कृणाल पांड्यानं 4 धावा केल्या. त्यामुळं भारतानं 134 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांच्या सुमार गोलंदाजीमुळं हे आव्हान दक्षिण आफ्रिकीनं 17 ओव्हरमध्येच पूर्ण केले.

वाचा-विराटची एक चूक अन् टीम इंडियाचा फ्लॉप शो, भारतानं गमावली मालिका

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 07:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...