India vs South Africa : टीम इंडियाच कसोटी क्रिकेटचा बादशाह, आफ्रिकेविरुद्धच्या विजयानं ऑस्ट्रेलियाला दिला धोबीपछाड!

India vs South Africa : टीम इंडियाच कसोटी क्रिकेटचा बादशाह, आफ्रिकेविरुद्धच्या विजयानं ऑस्ट्रेलियाला दिला धोबीपछाड!

भारतानं तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0नं आपल्या नावावर केली आहे.

  • Share this:

पुणे, 13 ऑक्टोबर : भारतीय संघानं विराट कोहलीच्य नेतृत्वाखाली पुण्यातील कसोटी मालिकेत विजय मिळवत मालिकेवर कब्जा केल आहे. भारतानं तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0नं आपल्या नावावर केली आहे. यासोबत टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. भारतीय संघानं घरच्या मैदानावर आतापर्यंत 11 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही संघाला 10पेक्षा जास्त मालिका घरच्या मैदानावर जिंकता आलेल्या नाहीत.

याआधी ऑस्ट्रेलियाने दोन वेळा घरच्या मैदानावर सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. भारताने फेब्रुवारी 2013 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.दोन्ही कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी टीम इंडियाला दणक्यात विजय मिळवून दिला.

ऱा कसोटी सामना भारताने एक डाव आणि 137 धावांनी जिंकून मालिकासुद्धा 2-0 ने खिशात घातली. भारताने पहिल्या डावात 601 धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेला 275 धावांवर बाद करत फॉलोऑन दिला. दुसरा डाव 189 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून दुसऱ्या डावात जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर अश्विनने दोन आणि शमी, इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

भारतानं दक्षिण आफ्रिकेला नमवत घरच्या मैदानात 11व्या कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाच्या घरच्या मैदानात कसोटी मालिकेच्या विजयाचा प्रवास हा 2015-2016मध्या झाला होता. त्यानंतर 2016-17मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया संघाला नमवलं. त्यानंतर 2018मध्ये श्रीलंकेविरोधात तर, 2018मध्ये अफगाणिस्तानविरोधात मलिका विजय मिळवला होता. 2013पासून टीम इंडियानं एकही सामना गमावलेला नाही. याआधी स्टिव्ह वॉ आणि मार्क टेलरच्या नेतृत्वाखाली क वेळा तर रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा हा पराक्रम केला होता.

घरच्या मैदानावर सर्वात जास्त मालिका जिंकणारे संघ

11- भारत (2012-12 ते आतापर्यंत)

10- ऑस्ट्रेलिया (1994-95, 2000-01)

10- ऑस्ट्रेलिया (2004-2008-09)

8-वेस्ट इंडिज (1975-76 ते 1985-86)

VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

First published: October 13, 2019, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading