India vs South Africa : आफ्रिका दौऱ्यासाठी 6 दिवसआधीच झाली टीम इंडियाची निवड! 'हे' आहे कारण

15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 04:47 PM IST

India vs South Africa : आफ्रिका दौऱ्यासाठी 6 दिवसआधीच झाली टीम इंडियाची निवड! 'हे' आहे कारण

मुंबई, 31 ऑगस्ट : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरोधात भिडणार आहे. 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान या दौऱ्यासाठी 29 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची निवड करण्यात आली. मात्र, याआधी 4 सप्टेंबरला संघाची घोषणा करण्यात येणार आहे, अशा बातम्या होत्या. दरम्यान एका वेगळ्याच कारणांमुळं संघाची निवड एवढ्या लवकर करण्यात आली.

दरम्यान, तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यात महेंद्रसिंग धोनी, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच, वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती देण्यात आलेल्या हार्दिक पांड्याला संघात स्थान दिले आहे. बाकी संघ हा वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 सामन्यात सामिल झालेलाच आहे. दरम्यान निवड समितीनं टेलिकॉन्फरन्सवरून संघाची निवड केली.

या कारणामुळं संघाची निवड 6 दिवसआधी

मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात नवी जर्सी मिळणार आहे. त्यामुळं संघाची निवड घाईघाईत करण्यात आली. भारतीय संघाच्या जर्सीवर प्रायोजकांचा लोगो बदलण्यात येणार आहे. त्यासंदर्भात जर्सी तयार करणारी कंपनी नाईकीनं अतिरिक्त वेळ मागून घेतला होता. त्यामुळं संघाची निवड लवकर करण्यात आली.

वाचा-सामन्यादरम्यान मैदानातच कोसळला दिग्गज फलंदाज!

Loading...

ओप्पो ऐवजी जर्सीवर दिसणार बयजू

आतापर्यंत भारतीय संघाच्या जर्सीवर ओप्पो कंपनीचे नाव होते. कारण ओप्पो कंपनीनं 5 वर्षांसाठी बीसीसीआयकडून हे अधिकार विकत घेतले होते. मात्र आता हे अधिकार पुढील तीन वर्षांसाठी बयजू या कंपनीकडे जाणार आहेत.

धोनीला संघात जागा नाही

इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, धोनीनं स्वत: दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यामुळं धोनीला या मालिकेत संघात जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळं ऋषभ पंतकडे विकेटकिपींगची जबाबदारी असणार आहे. धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही विश्रांती घेतली होती. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपमध्येही धोनी सामिल होण्याची शक्यता कमी आहे.

वाचा-सलग दुसऱ्या मालिकेत धोनीला वगळले! असा आहे आफ्रिकेविरुद्धचा भारतीय संघ

या धर्तीवर झाली संघाची निवड

आफ्रिकेविरोधात भारतीय संघाची 2020 टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टिकोणातून निवड झाली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या संघात खेळाडूंची निवड करताना टी-20 वर्ल्ड कपचा निकष समोर ठेवला आहे. त्यामुळं धोनीला संघात जागा दिलेली नाही. भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2020आधी 22 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळं ची-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे.

3 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दिपक चहर, नवदीप सैनी.

वाचा-INDvsWI : पंत-विहारी यांनी सावरला डाव, भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा

गणपती बाप्पांनी बुजवले रस्त्यांवरचे खड्डे, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: team india
First Published: Aug 31, 2019 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...