Home /News /sport /

IND vs SA, ODI Series : कॅप्टन राहुल बोलत राहिला आणि विराट ऐकत राहिला.. Team India चं बदलतं चित्र...

IND vs SA, ODI Series : कॅप्टन राहुल बोलत राहिला आणि विराट ऐकत राहिला.. Team India चं बदलतं चित्र...

2017 नंतर प्रथमच विराट कोहली दुसऱ्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. महेंद्र सिंग धोनीनंतर के एल राहुलच दुसरा खेळाडू आहे ज्याच्या कॅप्टन्सीखाली विराट खेळतो आहे.

    नवी दिल्ली, 17 जानेवारी –  दक्षिण अफ्रिकेविरुद्ध (South Africa Vs India) टेस्ट सिरिज संपल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) ने वन डे सीरिजसाठी तयारी सुरू केली आहे. कॅप्टन के एल राहुल (New caption Team India KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली टिम इंडिया 3 सामन्यांची वन डे सीरिज जिंकण्याचा प्रयत्न करेल. वन डेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर ही पहिलीच सीरिज असल्यानं विराट कोहलीसाठी ही सीरिज विशेष असेल. बीसीसीआय (BCCI) नं Team India च्या प्रॅक्टिस सेशनचे फोटो जारी केले आहेत. त्यामध्ये कॅप्टन के एल राहुल (KL Rhul) अॅक्शनमध्ये दिसत आहे. के एल राहुलसोबत कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि इतर सर्व खेळाडू उभे आहेत. विशेष म्हणजे विराट कोहली (Virat Kohali) सुद्धा इतर खेळाडूंप्रमाणे सर्कलमध्ये उभा आहे. आणि कॅप्टन राहुल जे बोलत आहे, तो ते अगदी कान देऊन ऐकत आहे. फोटोमध्ये श्रेयस अय्यर याच्यासोबत विराट कोहली उभा असल्याचं दिसत आहे. आता कॅप्टन राहुल, कोहली नव्हे 2017  नंतर प्रथमच विराट कोहली दुसऱ्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. महेंद्र सिंग धोनीनंतर के एल राहुलच हा दुसरा खेळाडू आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) सामन्यांसाठी टिमची घोषणा करण्यात आली होती, त्याच वेळी विराट कोहलीला (Virat Kohali) कर्णधारपदावरून हटवलं होतं. विराटनं स्वतः टी-ट्वेंटीचं कर्णधारपदापद सोडलं होतं. एका फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असावा म्हणून निवडकर्त्यांना ते योग्य वाटलं. त्यामुळे रोहित शर्माच्या हातात टिम इंडियाची जबाबदारी दिली. आता तर विराटनं टेस्ट क्रिकेटचं कर्णधारपदही सोडलं आहे. दक्षिण अफ्रिकेचा दौरा सुरू होण्यापूर्वी विराट कोहली खेळेल की नाही याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. अनेक रिपोर्ट्समध्ये त्याच्या खेळण्याविषयी शंका व्यक्त करण्यात आली होती. परंतु विराट कोहलीनं हे सर्व रिपोर्ट्स चुकीचे सिद्ध केले आणि वन डे सीरिज खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. मोठी बातमी: विराट कोहलीनंतर होणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनचे नाव ठरले! टिम इंडियाचा पहिला सामना 19 जानेवारीला खेळला जाणार आहे. सीरिजमध्ये होणारे तीन सामने फक्त पाच दिवसांच्या आतच संपणार आहेत. 19, 21 आणि 23 जानेवारीला वन डे सामने होणार आहेत. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दिवशी आहेत मॅच पहिला वन डे – 19 जानेवारी, बॉलेंड पार्क, पार्ल दुसरा वन डे – 21 जानेवारी, बॉलेंड पार्क, पार्ल तिसरा वन डे – 23 जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन (सर्व मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होतील).
    Published by:News18 Web Desk
    First published:

    Tags: Cricket news, Kl rahul, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या