धोनी काही कर पण पुढची मालिका खेळ! चाहत्यांची आर्तहाक, PHOTO VIRAL

धोनी काही कर पण पुढची मालिका खेळ! चाहत्यांची आर्तहाक, PHOTO VIRAL

वर्ल्ड कपनंतर गेले दोन-तीन महिने धोनी क्रिकेटपासून लांब आहे, त्यामुळं त्याच्या चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

  • Share this:

मोहाली, 17 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान दुसरा टी-20 18 सप्टेंबरला मोहाली येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात होणारी ही मालिका भारतीय संघाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. पुढच्या वर्षी येणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संघात स्थान मिळावे, याची दिशा कर्णधार कोहलीला कळेल. दरम्यान या मालिकेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची निवड करण्यात आलेली नाही.

महेंद्रसिंग धोनीनं आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना वर्ल्ड कप 2019मध्ये न्यूझीलंड विरोधात खेळला, त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातही धोनीला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळं धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

एकीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत आहेत, तर दुसरीकडे धोनीचे चाहते त्यानं एक मालिका खेळावी म्हणून आतुर झाले आहेत. याचा प्रत्यय दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात आला. धर्मशाला मैदानावर धोनीचा एक चाहता हातात, “500 रूपये जास्त घे पण, पुढची मालिका खेळ”, अशी पाटी घेऊन धोनीला विनंती केली. धोनीच्या या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वर्ल्ड कप दरम्यान धोनीच्या धिम्या खेळीवरून टीका करण्यात आली होती. त्यानंतर धोनीनं काही काळ क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विश्रांती घेतल्यानंतर धोनीनं लष्करात सामिल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार 15 दिवस धोनीनं जम्मू काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेतले. दरम्यान धोनी दक्षिण आफ्रिकानंतर बांगलादेश विरोधात होणाऱ्या मालिकेत खेळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार धोनी

आयपीएलमधील संघ चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे. धोनीनं कर्णधार म्हणून चेन्नई सुपरकिंग्ज संघाला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळं येत्या आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या प्रकरणावर सीएसकेचे मालक श्रीनिवासन यांनी मोठा खुलासा केला आहे. श्रीनिवासन यांनी धोनीच पुढच्या हंगामात कर्णधार असल्याचे स्पष्ट केले आहे. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत धोनी आयपीएलच्या हा हंगाम खेळणार असल्याचे सांगितले.

VIDEO 'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 08:59 PM IST

ताज्या बातम्या