• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Smriti is back : सांगलीकर स्मृती मंधानाच्या रेकॉर्डब्रेक खेळीमुळे आफ्रिकेची धूळधाण

Smriti is back : सांगलीकर स्मृती मंधानाच्या रेकॉर्डब्रेक खेळीमुळे आफ्रिकेची धूळधाण

भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa) पहिल्या वनडेमध्ये झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या मॅचमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. स्मृती मंधानाच्या रेकॉर्डब्रेक खेळीमुळे भारताचा 9 विकेटने विजय झाला आहे.

 • Share this:
  लखनऊ, 9 मार्च : भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa) पहिल्या वनडेमध्ये झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या मॅचमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताचा 9 विकेटने विजय झाला. भारताला या मॅचमध्ये विजयासाठी 158 रनचं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग टीमने फक्त 28.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि पूनम राऊत (Poonam Raut) या दोघींनी अर्धशतकं केली, तर झूलन गोस्वामीने (Jhulan Goswami) 42 रन देऊन 4 विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाडला 3 विकेट घेण्यात यश आलं. भारतीय टीमच्या या विजयात स्मृती मंधानाने आक्रमक खेळी केली, सोबतच तिने विश्वविक्रमही स्वत:च्या नावावर केला. स्मृतीने 64 बॉलमध्ये नाबाद 80 रन केले, यात 3 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता. मंधानाचा स्ट्राईक रेटही 125 चा होता. तर पूनम राऊतने 89 बॉलमध्ये नाबाद 62 रनची खेळी केली. मंधानाचा विश्वविक्रम डावखुरी ओपनिंग बॅट्समन असलेल्या मंधानाने लागोपाठ 10व्यांदा आव्हानाचा पाठलाग करताना 50 पेक्षा जास्त रन केले आहेत. हा रेकॉर्ड करणारी ती जगातली पहिली क्रिकेटपटू आहे. 2018 पासून जेव्हा भारताने वनडे क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग केला, तेव्हा स्मृतीने 50 पेक्षा जास्त रन केले आहेत. पहिल्या वनडेमध्ये भारताचा 8 विकेटने पराभव झाला होता. कोरोना व्हायरसनंतर महिला टीमची ती पहिलीच मॅच होती. 364 दिवसानंतर भारतीय टीम पहिल्यांदाच मैदानात उतरली होती. आता सीरिजची तिसरी वनडे 12 मार्चला लखनऊमध्येच होणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: