Home /News /sport /

IPL साठी टीम इंडियाची आणखी एक सीरिज होणार रद्द!

IPL साठी टीम इंडियाची आणखी एक सीरिज होणार रद्द!

आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांच्या आयोजनासाठी (IPL 2021) टीम इंडियाची (Team India) आणखी एक सीरिज रद्द होणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भारत-दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली टी-20 सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 मे : आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांच्या आयोजनासाठी (IPL 2021) टीम इंडियाची (Team India) आणखी एक सीरिज रद्द होणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भारत-दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली टी-20 सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) ही सीरिज खेळवली जाणार होती, पण आयपीएलचे उरलेले सामने सप्टेंबर महिन्यात होणार आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आयपीएलपेक्षा चांगली संधी असू शकत नाही, असं बीसीसीआयला (BCCI) वाटत आहे. याआधीच कोरोनाचं संकट आणि टीमचं व्यस्त वेळापत्रक यामुळे आशिया कप (Asia Cup) आधीच दोन वर्षांनी पुढे ढकलण्यात आला आहे. 'भारत आणि दक्षिण आफ्रिका सीरिजचं तसंही आयोजन होणं शक्य नव्हतं, त्यामुळे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आयपीएलपेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार 19 किंवा 20 सप्टेंबरपासून आयपीएलला सुरुवात होऊ शकते, तर 10 ऑक्टोबरला फायनल व्हायची शक्यता आहे. यानंतर लगेच टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. याबाबत बीसीसीआयने मात्र अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने जर टी-20 सीरिज रद्द केली, तर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जास्त मॅच खेळू शकते. टी-20 वर्ल्ड कपनंतर भारत घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या सीरिजचं वेळापत्रकही बदललं जाऊ शकतं. टी-20 वर्ल्ड कप कधी संपेल त्यावरच या सीरिजचं वेळापत्रक अवलंबून आहे. याशिवाय भारतातल्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवरही सीरिजचं भविष्य ठरेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Cricket, IPL 2021, South africa, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या