India vs South Africa : रोहितनं सांगितले शमीच्या 5 विकेट मागचं बिर्याणी कनेक्शन! पाहा VIDEO

India vs South Africa : रोहितनं सांगितले शमीच्या 5 विकेट मागचं बिर्याणी कनेक्शन! पाहा VIDEO

रोहित शर्मानं सांगितलं मोहम्मद शमीच्या 5 विकेट मागचं रहस्य.

  • Share this:

विशाखापट्टणम, 06 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारतानं तब्बल 203 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात रोहितला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. दरम्यान सामन्यानंतर रोहितनं मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचे कौतुक करत त्यानं पाच विकेट कशा घेतल्या, याचे रहस्य सांगितले.

मोहम्मद शमीनं या सामन्यात दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितनं शमीचे कौतुक करत त्याच्या बिर्याणी प्रेमाबाबत सांगितले. भारतीय क्रिकेट संघाच्या इन्स्टाग्रामवर टाकलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यात रोहितनं, “सगळ्यांना माहित आहे की शमी जेव्हा फ्रेश असतो तेव्हा तो काहीही करू शकतो. सोबत थोडी बिर्याणी असली की तर...”, अशी मस्करी करत शमीची फिरकी घेतली.

फिटनेससाठी शमीनं केला होता बिर्याणीचा त्याग

शमीला बिर्याणी खुप आवडते. त्याला संधी मिळते तेव्हा तो फक्त बिर्याणीच खातो. मात्र फिट राहण्यासाठी शमीनं बिर्याणीचा त्याग केला होता. त्याला वर्ल्ड कप 2019मध्ये हा त्याग करावा लागला होता.

वाचा-वादळाचं दुसरं नाव मोहम्मद शमी! 5 विकेटसह 'या' विक्रमांवर कोरले नाव

 

View this post on Instagram

 

Expect the Hitman to come up with such gems. This one is for Shami 😜😁😂 #TeamIndia #INDvSA @paytm

A post shared by Team India (@indiancricketteam) on

रोहितनं केले शमीचे कौतुक

शमीनं दुसऱ्या डावात घेतलेल्या पाच विकेटच्या जोरावर भारतानं विजयावर शिक्कामोर्तब केला. यावेळी शमीचे कौतुक करताना रोहितनं, “अशा परिस्थितीमध्ये अशी गोलंदाजी आपण फक्त आजचं पाहिली आहे, असे नाही. याआधीही अशा प्रकारची गोलंदाजी पाहिली आहे. मला अजूनही आठवते की 2013मध्ये कोलकातामध्ये जेव्हा मी पदार्पण केले होते. तेव्हा पीच अशी नव्हती मात्र चौथ्या आणि पाचव्या दिवशी पिच थोडी धिमी झाली होती. या पिचवर गोलंदाजी करणे कठिण असते. मात्र शमीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे”, असे सांगितले.

वाचा-फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग

आफ्रिका विरोधात दुसऱ्या डावात पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज

मोहम्मद शमी जगातला असा पहिला गोलंदाज ठरला आहे ज्यानं दक्षिण आफ्रिका विरोधात दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या आहेत. शमीच्या आधी अशी कामगिरी कोणत्याच गोलंदाजाला करता आली नाही. विशाखापट्टणम झालेल्या या कसोटी सामन्यात शमीनं तेंबा बावुमा, फाफ ड्यु प्लेसिस, क्विंटन डी कॉक, डेन पीड आणि रबाडा यांना आऊट केले.

पाच विकेटमध्ये चार फलंदाजांना केले बोल्ड

मोहम्मद शमीनं या सामन्यात पाच विकेट घेतल्या, यातील चार विकेट या फलंदाजांना क्लीन बोल्ड करत घेतल्या. अशीच कामगिरी वेस्ट इंडिज विरोधात जसप्रीत बुमराहनं केली होती. शमीनं दुसऱ्या डावात तेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक, डेन पीड आणि फाफ ड्यु प्लेसिस यांना क्लीन बोल्ड केले.

वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

First published: October 6, 2019, 7:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading