सराव सामन्यात रोहित शर्मा झाला ‘झिरो’, तर दुसरीकडे राहुल ठरला ‘हिरो’!

सराव सामन्यात रोहित शर्मा झाला ‘झिरो’, तर दुसरीकडे राहुल ठरला ‘हिरो’!

दक्षिण आफ्रिका विरोधात रोहितसाठी सलामीचे दरवाजे जवळजवळ बंद झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट संघात कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी कोण करणार हा प्रश्न कायम आहे. यासाठी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्यात टक्कर सुरू आहे. सलग फ्लॉप खेळीनंतर निवड समितीनं राहुलला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळं सलामीसाठी रोहित शर्माचे नाव आघाडीवर होते. मात्र, रोहितनं बोर्ड प्रजिडेंट इलेव्हन आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या तीन एकदिवसीय सराव सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. दुसऱ्याच चेंडूवर आपलं खात न उघडता रोहित बाद झाला. त्यामुळं आता रोहितचे सलामीसाठीचे दरवाजे जवळजवळ बंद झाले आहे.

तर, दुसरीकडे रोहित शर्माच्या फ्लॉप खेळीनंतर संघाबाहेर असलेल्या केएल राहुलनं शतकी कामगिरी केली आहे. राहुलनं विजय हजारे करंडक स्पर्धेत शतकी कामगिरी केली आहे. 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत राहुलला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्याजागी रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले. एकाच दिवशी दोघांनी केलेल्या फलंदाजीमध्ये एक हिरो ठरला तर एक झिरो ठरला. रोहित शुन्यावर बाद झाला तर राहुलनं 131 धावांची खेळी केली.

वाचा-‘तू तुझ्याच स्टाईलनं खेळ नाहीतर...’, दिग्गज क्रिकेटपटूनं रोहितला दिली वॉर्निंग

टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह कसोटीत मात्र फेल

वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्यामुळं रोहितचे एकदिवसीय आणि टी-20 मधले रेकॉर्ड पाहता, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे रोहितनं 218 एकदिवसीय सामन्यात 8 हजार 686 धावा केल्या आहेत. तर, दुसरीकडे रोहितनं केवळ 27 कसोटी सामने खेळले आहेत. यात 1 हजार 585 धावा केल्या आहेत. 177ही कसोटी क्रिकेटमधली रोहितची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

वाचा-रोहितसाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे बंद! दुहेरी शतकांच्या बादशाहला झालयं तरी काय?

राहुलनं केली चमकदार कामगिरी

विजय हजारे करंडक स्पर्धेत सलामीला आलेल्या राहुलनं केरळ विरोधात 122 चेंडूत 131 धावांची तुफान कामगिरी केली. त्यामुळं राहुलनं निवड समितीला सडेतोड उत्तर दिले आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात राहुलला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. दरम्यान विजय हजारे करंडकमध्ये राहुलनं 10 चौकार आणि 4 षटकार लगावत 107.37च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली.

वाचा-…तर टीम इंडियाला नवीन खेळाडू कधीच मिळणार नाहीत, द्रविडनं व्यक्त केली भीती

अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2019 07:38 AM IST

ताज्या बातम्या