रोहितचा विराट अवतार! भरमैदानात गोलंदाजाला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

रोहितचा विराट अवतार! भरमैदानात गोलंदाजाला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

रोहित शर्माचा हा अवतार पाहून चाहत्यांना बसला धक्का.

  • Share this:

बंगळुरू, 27 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिका विरोधात टी-20 मालिका बरोबरीत झाल्यानंतर 2 ऑक्टोबरपासून कसोटी सामना सुरू होणार आहे. दरम्यान तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 9 विकेटनं मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या चिंता वाढल्या आहेत. या सामन्यात विराटसेनेला अपेक्षेप्रमाणे खेळी करता आली नाही. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपमध्ये नवीन खेळाडूंना संधी मिळणार का याबाबत चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्याला होऊन एक आठवडा होत आला असला तरी, या सामन्याच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत. या सामन्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच रोहितचा एक वेगळाच अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला.

चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या सामन्यात भारताची गोलंदाजी सुरू असताना रोहित शर्मा चक्क गोलंदाजाव बरसला. रोहितनं नवदीप सैनीवर राग काढत, तुला अक्कल आहे का, असे विचारले. चिन्नास्वामी मैदानावर विराटच्या दुखापतीमुळं त्यानं मैदान सोडले, त्यावेळी काही काळ रोहितनं ही जबाबदारी स्वीकारली. यावेळी गोलंदाज नवदीप सैनीच्या चेंडूवर फलंदाजांनं मारलेला चौकार पाहून रोहित शर्माला राग अनावर झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 12व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. सैनीनं लेग साईडला आफ्रिकेच्या तेंबा बावुमाला फुलटॉस चेंडू टाकला, त्यामुळं रोहित संतापला.

दरम्यान, रोहितचा हा अवतार पाहून चाहतेही संतापले आहेत. दरम्यान 2 ऑक्टोबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना होणार आहे. या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं एकही कसोटी सामना खेळू शकणार नाही आहे. बुमराहच्या पाठीला झालेल्या दुखापतीमुळं त्यानं दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा-विराटची चिंता वाढली, भारताचं कसोटीतील सिंहासन धोक्यात!

बुमराहशिवाय जलद गोलंदाजी होणार कमकुवत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दरम्यान बुमराहनं माघार घेतल्यामुळं जलद गोलंदाजीमध्ये भारतीय संघला उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या तीन गोलंदाजांवर अवलंबून रहावे लागणार आहे. बुमराहनं वेस्ट इंडिज विरोधात हॅट्ट्रिक घेत पाच विकेट घेण्याती कामगिरी केली होती. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा बुमराह भारताचा तिसरा गोलंदाज आहे. बुमराहनं 12 कसोटीत 5 वेळा एका डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि विंडीजविरुद्ध एकाच डावात 5 विकेट घेणारा बुमराह पहिला आशियाई गोलंदाज आहे. त्यामुळं त्याची कमतरता भारताला जाणवणार आहे.

वाचा-‘25 वर्षांनंतर आता प्रकरण काढायची गरजचं काय’? द्रविड प्रकरणी धुसपुस सुरूच

सलामीला नवी जोडी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली खरी, पण सलामीच्या जोडीकडून मात्र निराशा झाली. त्यामुळे आता आफ्रिकेविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल भारतीय डावाची सुरुवात करतील. या जोडीला सूर गवसल्यास आफ्रिकेला नमवणं भारतासाठी सोपं ठरणार आहे.

भारताचा कसोटी संघ- विराट कोहली, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृध्दीमान साह, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गील.

वाचा-भारताच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीवर आरोप, ‘मनमानी थांबवून निवृत्तीवर विचार करावा’

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading