India vs South Africa : अखेर ऋषभला डच्चू! आफ्रिका विरोधात 'या' खेळाडूला मिळाली संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ऑक्टोबरला होत पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 12:56 PM IST

India vs South Africa : अखेर ऋषभला डच्चू! आफ्रिका विरोधात 'या' खेळाडूला मिळाली संधी

विशाखापट्टणम, 01 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ऑक्टोबरला होत पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीनं या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये पंतला डच्चू देण्यात आला आहे, असे सांगितले. पंतच्या जागी या सामन्यात ऋध्दीमान साहाला संधी देण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात पंतला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळं त्याची संघातील जागा धोक्यात आली होती. अखेर आता विराट कोहलीनं फॉर्ममध्ये नसलेल्या पंतला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान तब्बल वर्षभराच्या काळानंतर ऋध्दीमान साहा संघात पुनरागमन करत आहे.

साहानं शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2018मधअये दक्षिण आफ्रिका विरोधातच खेळला होता. मात्र या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळं साहाला संघाबाहेर बासावे लागले. त्यानंतर पंतला विकेचकीपर फलंदाज म्हणून संघात जागा मिळाली. मात्र पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचा फटका पंतला बसला आणि त्याला संघाबाहेर करण्यात आले आहे.

दरम्यान सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संघात सामिल करण्यात येणार असल्याचे सांगितले. अश्विनला वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्यामुळं भारत आता पहिल्या कसोटी सामन्यात नवीन सलामीची जोडी आणि दोन फिरकी गोलंदाज यांच्यासह मैदानात उतरेल.

भारताला जिंकावी लागेल मालिका

Loading...

भारतीय संघ 2 ऑक्टोबरपासून अफ्रिका विरोधात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेत विराटसेनेला एक पराभवही महागात पडू शकतो. जगातील नंबर 1 कसोटी संघ असलेल्या भारतीय संघाचे स्थान धोक्यात आले आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यात फक्त मालिकेत विजय मिळवण्याची नाही तर कसोटी रँकिंगमध्ये पाहिले स्थान मिळवण्याची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला एक चूक महागात पडू शकते. दुसरीकडे जर भारताने मालिका गमावली तर दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल.

बुमराहशिवाय जलद गोलंदाजी होणार कमकुवत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दरम्यान बुमराहनं माघार घेतल्यामुळं जलद गोलंदाजीमध्ये भारतीय संघला उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या तीन गोलंदाजांवर अवलंबून रहावे लागणार आहे. बुमराहनं वेस्ट इंडिज विरोधात हॅट्ट्रिक घेत पाच विकेट घेण्याती कामगिरी केली होती. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा बुमराह भारताचा तिसरा गोलंदाज आहे. बुमराहनं 12 कसोटीत 5 वेळा एका डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि विंडीजविरुद्ध एकाच डावात 5 विकेट घेणारा बुमराह पहिला आशियाई गोलंदाज आहे. त्यामुळं त्याची कमतरता भारताला जाणवणार आहे.

भारताचा कसोटी संघ- विराट कोहली, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृध्दीमान साह, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गील.

VIDEO: प्रकाश आंबेडकर आज उमेदवारांची यादी जाहीर करणार? इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2019 12:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...