India vs South Africa : पंतचे दिवस भरले! टीम मॅनेजमेंटनं दिली धमकी पण गंभीरनं घेतली बाजू

महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतची संघात निवड झाली, मात्र त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 04:54 PM IST

India vs South Africa : पंतचे दिवस भरले! टीम मॅनेजमेंटनं दिली धमकी पण गंभीरनं घेतली बाजू

बंगळुरू, 23 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिका विरोधात भारतानं खेळलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतानं सुमार दर्जाची फलंदाजी केली. त्यामुळं भारताच्या फलंदाजीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यात ऋषभ पंतवर सर्वात जास्त ताशेरे ओढले जात आहे. महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतची संघात निवड झाली, मात्र त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋषभ पंत केवळ 19 धावा करत आऊट झाला. याआधी मोहालीमध्ये झालेल्या दुसऱ्य़ा टी-20 सामन्यात पंतनं केवळ 4 धाव करत बाद झाला. या दोन्ही सामन्यात एक गोष्ट खास होती, ती म्हणजे पंतची बाद होण्याची पध्दत. दोन्ही सामन्यात पंत बेजबाबदार शॉट मारत बाद झाला.

एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये पंतला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळं निवड समितीचे प्रमुख एम. एस. के प्रसाद यांनी पंतला धमकी दिली आहे. यासाठी पंतच्या जागी इशान, किशन, संजू सॅमसन आणि इतर खेळाडूंचे पर्याय तयार केले आहे. याआधी भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फलंदाजांना सतत संधी दिली जाणार नाही, अशा शब्दात सुनावले होते. त्यामुळं पंतचे दिवस आता भरले आहे, असेच चित्र दिसत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधातही पंतनं त्याच चुका केल्या. त्यामुळं याचा भुगदंड त्याला भरावा लागणार आहे. दरम्यान या सगळ्यात पंतच्या मदतीसाठी गौतम गंभीर धावून आला आहे.

वाचा-पंतने विराटला तोंड लपवायला जागा ठेवली नाही, शेवटी टोपीचा आधार!

गंभीरनं केली निवड समितीवर टीका

Loading...

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरनं पंतची शाळा घेतल्याबद्दल निवड समितीवर टीका केली आहे. गंभीरनं टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात “निवड समितीनं पंतसाठी बेजबाबदार, निष्काळजी असे शब्द वापरले नाही पाहिजेत. त्यामुळं पंत धावांसाठी नाही तर संघात आपली जागा मिळवण्यासाठी फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळं तो बाद होत आहे”, असे लिहिले आहे. तसेच, कोणत्याही युवा खेळाडूला सांभाळून घेण्याची ही पध्दत नाही असेही गंभीरनं आपल्या लेखात लिहिले आहे. पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाज जमेत नसेल तर त्याला पाचव्या क्रमांकावर पाठवून पाहा, असा सल्लाही गंभीरनं दिला.

वाचा-टीम इंडियात चाललंय काय? चौथ्या क्रमांकासाठी पंत-अय्यर यांच्यात गोंधळ

कसा घेणार पंत धोनीची जागा

पंतने टी-20मध्ये 19 सामन्यात 20.40च्या सरासरीने 306 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 65 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीने त्याच्या पहिल्या 19 टी-20 सामन्यात 25च्या सरासरीने 310 धावा केल्या. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. 45 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पण पंत आणि धोनीच्या बाबत एक गोष्ट वेगळी आहे. ती म्हणजे या दोघांचा फलंदाजीला येण्याचा क्रम होय. पंत टॉप ऑर्डरमध्ये खेळण्यास येतो तर धोनी तळाच्या क्रमवारीत फलंदाजीसाठी येत असे. या फरकाशिवाय दोघांच्या टी-20 करिअरची कामगिरी समानच आहे. पंतचे आतापर्यंतचे करिअर आणि धोनीच्या सुरुवातीच्या करिअरची तुलना केल्यास दोघांच्या कामगिरीत फार मोठा फरक नाही. पण धोनीने प्रत्येक वर्षी त्याच्या खेळात सुधारणा केली. धोनीवर कधीच विकेट बेजबाबदारपणे गमवण्याचा आरोप झाला नाही. पंतच्या बाबत हाच मोठा आरोप केला जात आहे. जर धोनी प्रमाणेच पंतने देखील हा डाग बाजूला केल्यास तो महान खेळाडू होऊ शकेल.

वाचा-पंतला मार्गदर्शनासाठी धोनी एकटाच नाही, गंभीरने सुचवला नवा पर्याय

टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकले का पंत?

पंतवर होणारी टीका विचारात घेता. तसेच रवी शास्त्री आणि विक्रम राठोड यांनी त्याला दिलेला इशारा पाहता आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये संघात जागा मिळवणे पंतसाठी अवघड होत चालले आहे. आक्रमक क्रिकेट आणि बेजबाबदार क्रिकेट यात फरक असतो, अशा शब्दात राठोड यांनी पंतला समज दिली होती. सध्या अशीही चर्चा सुरु आहे की, धोनीने निवृत्ती जाहीर न करण्याचे एक मुख्य कारण त्याला योग्य असा पर्याय मिळालेला नाही.

वाचा-निवड समितीनं शोधला पंतला पर्याय, तीन खेळाडूंची नावे आघाडीवर!

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...